Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रावर पुढील २४ तास पावसाचे सावट! 'या' ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट; विजांच्या कडकडाटासह अवकाळीचा इशारा

Published : Mar 19, 2026, 09:03 PM IST

Maharashtra Weather Alert: हवामान खात्याने पुढील २४ तासांत पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. सोलापूर, यवतमाळ, चंद्रपूरसह ६ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट जारी केला.

PREV
16
महाराष्ट्रावर पुढील २४ तास पावसाचे सावट! 'या' ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आता पुन्हा एकदा हवामान खात्याने (IMD) पुढच्या २४ तासांसाठी धोक्याचा इशारा दिला आहे. २० मार्च रोजी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या नैसर्गिक संकटामुळे शेतीकामांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

26
कुठे पाऊस आणि कुठे उकाडा? जाणून घ्या विभागांनुसार स्थिती

१. पश्चिम महाराष्ट्र: सोलापूरला 'यलो अलर्ट'

पुण्यात हवामान कोरडे आणि उष्ण राहील (तापमान ३३-३६°C), मात्र दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर असेल.

सातारा, सांगली आणि कोल्हापूर: हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता.

सोलापूर: येथे वादळी वाऱ्यासह (ताशी ४०-५० किमी वेग) पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

36
२. मराठवाडा: विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

मराठवाड्यात संमिश्र वातावरण पाहायला मिळेल.

लातूर, नांदेड आणि धाराशिव: या जिल्ह्यांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडू शकतो.

परभणी, बीड, हिंगोली: येथे हलक्या पावसाचा अंदाज आहे.

छत्रपती संभाजीनगर आणि जालना: या भागात मात्र उष्णता कायम राहील.

46
३. विदर्भ: नागपूर तापणार, पण 'या' जिल्ह्यांत पाऊस

विदर्भात उन्हाचा चटका वाढलेला असतानाच काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.

यवतमाळ आणि चंद्रपूर: या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

वर्धा आणि गडचिरोली: हलक्या ते मध्यम सरींची शक्यता.

नागपूर, अकोला, अमरावती: येथे तापमान ३८°C पर्यंत जाण्याची शक्यता असून हवामान उष्ण राहील. 

56
४. कोकण आणि उत्तर महाराष्ट्र: उकाड्यापासून सुटका नाही

मुंबई, ठाणे, पालघर: या भागात पाऊस नसला तरी हवेतील आर्द्रता वाढल्याने प्रचंड उकाडा आणि दमट हवामान राहील.

नाशिक, जळगाव, धुळे: उत्तर महाराष्ट्रात तापमानात वाढ सुरूच राहणार असून दिवसा उन्हाचा कडाका जाणवेल. 

66
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला

अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कापणी केलेले धान्य सुरक्षित ठिकाणी साठवावे. विजा चमकत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात उभे राहू नका, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories