Maharashtra Weather Update: कधी पाऊस, कधी ऊन! महाराष्ट्राच्या हवामानात मोठा उलटफेर; रविवारी तुमच्या शहरात काय असेल स्थिती?

Published : Mar 21, 2026, 08:16 PM IST

Maharashtra Weather Update: महाराष्ट्राच्या हवामानात उलटफेर झाला असून काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली, तर मुंबईसह कोकणात उष्णतेचा 'यलो अलर्ट' जारी केलाय. विदर्भ, मराठवाड्यात काही काळ विश्रांतीनंतर पुन्हा वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

PREV
15
कधी पाऊस, कधी ऊन! महाराष्ट्राच्या हवामानात मोठा उलटफेर

मुंबई: महाराष्ट्रातील हवामानाचा लपंडाव सुरूच असून, पुढील २४ तासांत राज्यावर पुन्हा एकदा 'दुहेरी संकट' घोंघावत आहे. मार्च महिना संपत असतानाच राज्याच्या काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, तर दुसरीकडे उन्हाचा पाराही चाळीसच्या जवळ पोहोचला आहे. २२ मार्च रोजी पावसाचा जोर काहीसा ओसरणार असला तरी, उकाडा आणि दमट हवामान नागरिकांची पाठ सोडणार नाहीये. 

25
कोकण आणि मुंबई: उष्णतेचा 'यलो अलर्ट'

कोकणातील अवकाळीचे संकट सध्या टळले असले तरी, मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर आता उष्ण आणि दमट हवामानाचा धोका वाढला आहे. हवामान विभागाने मुंबई आणि कोकणासाठी 'यलो अलर्ट' जारी केला असून, कमाल तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. घामाच्या धारांमुळे मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडण्याची शक्यता आहे. 

35
विदर्भ-मराठवाडा: विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचे पुनरागमन?

गेल्या काही दिवसांत गारपिटीने झोडपून काढलेल्या विदर्भात रविवारी (२२ मार्च) हवामान काहीसे कोरडे राहील. मात्र, हा दिलासा अल्पकाळ टिकणार असून २४ मार्चपासून पुन्हा एकदा वादळी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

मराठवाडा: छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांत हवामान कोरडे असेल, पण लातूर आणि धाराशिवमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता कायम आहे. 

45
मध्य आणि उत्तर महाराष्ट्र: कुठे पाऊस, कुठे ऊन?

पुणे, सातारा आणि नाशिक: या भागात हवामान मुख्यत्वे कोरडे राहील आणि तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

दक्षिण महाराष्ट्र: सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर परिसरात ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. 

55
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा

२३ मार्चपासून पुन्हा एकदा वादळी पावसाचा जोर वाढणार असल्याने शेतीकामांचे नियोजन करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories