अतिरिक्त प्रवास: दादर किंवा मुंबईच्या मध्यवर्ती भागातून प्रवाशांना आता सामानासह दिव्यापर्यंत लोकलने प्रवास करावा लागेल.
विस्कळीत नियोजन: अचानक झालेल्या या बदलामुळे प्रवाशांचे आधीच केलेले आरक्षणाचे नियोजन कोलमडले आहे.
दुजाभाव: कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या थांब्यांमध्ये होत असलेल्या कपातीमुळे रेल्वेवर प्रवाशांचा विश्वास कमी होत आहे.
रेल्वे प्रशासन आपला हा निर्णय मागे घेणार की प्रवाशांना असाच त्रास सहन करावा लागणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.