Weather Alert: हवामान विभागाने १९ सप्टेंबर रोजी राज्यात पावसाच्या पुनरागमनाचा अंदाज वर्तवला आहे. काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटाचा यलो अलर्ट जारी केलाय, तर कोकणासह इतर काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
मुंबई: राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. १९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये हवामान वेगवेगळं राहणार असून, काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे, तर काही जिल्ह्यांत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे.
27
कोकणात पावसाचा जोर ओसरतोय, पण...
मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मध्यम पावसाची शक्यता असून, कोकणात एकंदरीत पावसाचा जोर थोडा कमी झाल्याचं दिसत आहे.
37
पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस
पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांत हलक्यांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता.
सोलापूर येथे विजांच्या कडकडाटासह व वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, जालना, परभणी वादळी वाऱ्यांसह वीजांचा गडगडाट होण्याची शक्यता असून, हवामान खात्याने या भागांसाठी यलो अलर्ट दिला आहे.
हिंगोली, नांदेड येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
57
उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक घाट परिसरात सावधानतेचा इशारा
धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत हलक्यांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.
नाशिक, अहिल्यानगर व नाशिक घाटमाथा विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा इशारा देत यलो अलर्ट देण्यात आला आहे.
67
विदर्भात काही जिल्ह्यांत यलो अलर्ट, तर काही ठिकाणी कोरडं वातावरण
नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी केला आहे.
अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
77
हवामान विभागाचा इशारा, नागरिकांनी सतर्क राहा!
राज्यात १९ सप्टेंबर रोजी पावसाचा जोर विभागानुसार वेगवेगळा असणार आहे. कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावं, असा सल्ला देण्यात आला आहे.