Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पावसाने माघार घेतली असली तरी हवामान खात्याने बदलाचे संकेत दिले. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता असून, विदर्भ, मराठवाड्यात मात्र थंडीची चाहूल लागली. मुंबई, पुण्यात ढगाळ वातावरण राहील.
मुंबई: महाराष्ट्रात हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी काही जिल्ह्यांमध्ये अजूनही ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
27
कोकणात पुन्हा पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या माहितीनुसार, 7 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिणमध्य महाराष्ट्रातील काही भागातही हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात.
37
मुंबईत ढगाळ वातावरण
मुंबई आणि उपनगरांमध्ये शुक्रवारी अंशतः ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस आणि किमान 21 अंश सेल्सिअस इतके राहील. दमट उकाडा जाणवेल, पण संध्याकाळी गार वारे वाहण्याची शक्यता आहे.
पुण्यात दुपारनंतर आकाश ढगाळ राहू शकते. तापमानात किंचित घट होऊन किमान तापमान 18 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये मात्र हवामान मुख्यतः कोरडे राहील, फक्त काही ठिकाणी तुरळक सरींची शक्यता आहे.
57
उत्तर महाराष्ट्रात थंडीची चाहूल
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात स्वच्छ आकाश आणि थंड वातावरण राहील. दिवसाच्या वेळी कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस, तर रात्रीच्या सुमारास 18 अंश सेल्सिअसपर्यंत थंडी जाणवेल.
67
मराठवाडा आणि विदर्भात तापमानात घट
छत्रपती संभाजीनगर आणि लातूर परिसरात आता पावसाने पूर्ण उघडीप दिली असून हवामान कोरडे राहील. विदर्भात मात्र तापमान झपाट्याने खाली येत आहे. नागपूर आणि अमरावतीमध्ये किमान तापमान 17 अंश सेल्सिअसपर्यंत घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचा पहिला लहर जाणवू लागला आहे.
77
एकंदरीत वातावरण
राज्यातील बहुतेक भागांत पावसाने माघार घेतली असून आता ‘गुलाबी थंडी’ची चाहूल लागली आहे. मराठवाडा आणि विदर्भात रात्रीच्या वेळेस गारवा वाढला आहे, तर दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत अद्याप दमट वातावरण कायम आहे.