Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी E-KYC करण्याची मुदत १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली. तांत्रिक अडचणींमुळे सरकारने हा निर्णय घेतला असून, ऑक्टोबर महिन्याचा ₹1500 सन्मान निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.
Ladki Bahin Yojana Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी E-KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. अनेक महिलांनी अजूनही आपली E-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्यामुळे सरकारने अवधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
25
E-KYC साठी नवीन अंतिम तारीख
महिला व बाल कल्याण विभागाने घेतलेल्या अलीकडील बैठकीत E-KYC करण्याची मुदत १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी ही अंतिम तारीख १ नोव्हेंबरपर्यंत होती, मात्र अनेक लाभार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे OTP न मिळाल्याने प्रक्रिया पूर्ण करता येत नव्हती. त्यामुळे राज्य सरकारने महिलांना आणखी १७ दिवसांचा दिलासा दिला आहे.
35
ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वाटप सुरू
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी ₹1500 वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच सर्व पात्र महिलांच्या आधार संलग्नित बँक खात्यांमध्ये थेट जमा होईल. सरकारच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पुष्टी दिली आहे.
अनेक महिलांना ई-केवायसी करताना OTP न मिळण्याची अडचण येत आहे. ही प्रक्रिया सध्या पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकावर OTP येण्यावर आधारित असल्याने निराधार महिलांना अडथळे येत आहेत. सरकारकडून यावर नवीन पर्याय किंवा तांत्रिक उपाययोजना तयार करण्याचे काम सुरू असून, लवकरच यासंबंधी अधिकृत मार्गदर्शन जाहीर होण्याची शक्यता आहे.
55
महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन
महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दोन महिन्यांपूर्वीच सर्व महिलांना E-KYC लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. अनेक जिल्ह्यांत अजूनही प्रक्रिया अपूर्ण असल्याने विभागाने मुदतवाढ दिली आहे.