Konkan Railway Updates : कोकण रेल्वे बुधवारीही विस्कळीतच, मुंबईतून सुटणाऱ्या 13 एक्स्प्रेस रद्द

Published : Jul 10, 2024, 12:19 PM IST
Konkan Railway

सार

Konkan Railway Updates : गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

Konkan Railway Updates : मुंबई : पश्चिम किनारपट्टी पट्ट्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावर परिणाम झाला आहे. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अनेक प्रवासी अडकून पडले आहेत.

मंगळवारी संध्याकाळनंतर विस्कळीत झालेली कोकण रेल्वे अद्याप देखील रुळावर आलेली नाही. पडणे बोगद्यात सध्या युद्ध पातळीवर काम सुरू आहे. त्यामुळे मुंबई ते मडगाव या कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्या रद्द झालेल्या आहेत. तर लांब पल्ल्याच्या काही गाड्या या पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. असं असलं तरी प्रवाशांचे मात्र सध्या मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

आजच्या दिवशी रद्द करण्यात आलेल्या ट्रेन्स

12449 मडगाव जंक्शन : चंदीगड एक्सप्रेस

12620 बंगळुरू सेंट्रल : लोकमान्य टिळक एक्सप्रेस

12134 मंगळुरू जंक्शन : मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस

50107 सावंतवाडी रोड : मडगाव जंक्शन

दुसऱ्या मार्गावरुन वळवण्यात आलेल्या ट्रेन

16345 लोकमान्य टिळक : तिरुअनंतपुरम

22113 लोकमान्य टिळक : कोचिवल एक्सप्रेस

12432 हजरत निजामुद्दीन : तिरुअनंतपुरम, गाडी राजापूर रेल्वे स्थानकातून पनवेल मार्गे पुणे सोलापूर या मार्गावरून पुढे जाईल.

19260 भावनगर : कोचुवेली एक्सप्रेस, गाडी रत्नागिरी रेल्वे स्टेशनतुन मागे जाईल.

12224 लोकमान्य टिळक : एरणाकुलम एक्सप्रेस चिपळूण रेल्वे स्टेशनमधून मागे जाईल.

20932 इंदोर जंक्शन : कोचिवल्ली एक्सप्रेस, ही गाडी सुरत जळगाव वर्धा या मार्गे वळविण्यात आलेली आहे.

रत्नागिरी रेल्वे स्थानकामध्ये उभी असलेली भावनगर टर्मिनस : कोचीवली एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहे. ही ट्रेन पनवेल -पुणे-सोलापूर मार्गे वळवण्यात आलेली आहे.

तुळशी घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच

रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या अति मुसळधार पावसामुळे मंडणगड बाणकोट रस्त्यावरील तुळशी घाटात दरड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे. या मार्गावर तुळशी घाटात वारंवार दरड कोसळून वाहतूक ठप्प होत आहे. मंडणगड ते अंबडवे यादरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यात आलं. त्यामुळे रस्ता रुंदीकरणासाठी डोंगर कटिंग करण्यात आलं होतं. त्यामुळे सतत या डोंगरांची दरड कोसळत असल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

आणखी वाचा :

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : महिलांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!
महाराष्ट्रात 'थंडीचा कहर'! तापमान 'मायनस'मध्ये जाणार; 'या' ३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तुमच्या शहराचं तापमान तपासा!