बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन चिघळले, पोलिसांचा लाठीचार्ज

Published : Aug 20, 2024, 07:40 PM IST
police lathi charge on protesters

सार

बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलकांनी ९ तास रेल्वे सेवा ठप्प केली होती. मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला पण आंदोलक हटले नाहीत. अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

बदलापूर रेल्वे स्थानकावर पोलिसांकडून आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलकांकडून दगडफेक देखील झाली. पण पोलिसांनी पोलीस बळाचा वापर करत गर्दीला पांगवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पोलिसांनी संपूर्ण बदलापूर रेल्वे स्थानक खाली केले आहे. पोलीस हेल्मेट घालून रेल्वे रुळावर उतरले. त्यांनी आंदोलक पुरुष आणि तरुणांना लाठ्यांचा प्रसाद दिला. तर महिलांना सुरक्षितपणे बाजूला केले. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलक रेल्वे रुळाच्या बाहेरच्या दिशेला निघाले. संपूर्ण बदलापूर रेल्वे स्थानक रिकामं करण्यात पोलिसांना यश आले.

बदलापूर रेल्वे स्थानकावर पोलिसांनी आंदोलकांना वारंवार विनंती करुन देखील आंदोलक आंदोलन मागे घेण्यास तयार नव्हते. आंदोलकांनी जवळपास 9 तास रेल्वे सेवा ठप्प केली होती. मंत्री गिरीश महाजन स्वत: रेल्वे स्थानकावर आले. त्यांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. आरोपीवर कठोरात शिक्षा होईल, असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले होते. पण तरीही आंदोलक हटले नाहीत. त्यामुळे अखेर पोलिसांना आदोलकांवर लाठीमार करावा लागला. पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी आंदोलकांवर लाठीमार केला. पोलिसांनी आंदोलकांना पळवून पळवून लाठीमार केला. पोलिसांनी आंदोलकांना पांगवल्यानंतर काही आंदोलकांकडून पोलिसांच्या दिशेला दगडफेक केली.

रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी हालचाली सुरू

आंदोलनानंतर पोलिसांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. आंदोलक सकाळपासून रेल्वे रुळावर जमले होते. आंदोलकांना वारंवार विनंती केली जात होती. पण आंदोलक रेल्वे रुळावरुन हटण्यास तयार नव्हते. अखेर लाठीचार्ज करुन जमाव पाच मिनिटात रेल्वे रुळावरुन हटवण्यात आले आहे. हे ऑपरेशन होणे गरजेचे आहे. रेल्वे वाहतूक सुरु व्हायला हवी. यासाठी रेल्वे प्रशासनला आम्हाला अहवाल पाठवायचा आहे. यानंतर रेल्वे वाहतूक सुरु होईल”, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मीडियाला दिली.

लाठीचार्जमध्ये काही आंदोलक जखमी

पोलिसांच्या लाठीचार्जनंतर काही आंदोलक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बदलापूर रेल्वे स्थानकाला सध्या छावणीचे स्वरुप आले आहे. पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे. पोलिसांनी रेल्वे स्थानक आणि स्थानकाच्या बाहेरील गर्दी हटवली आहे. पोलीस सर्व परिस्थितीकडे बारकारईने लक्ष देवून आहेत.

पोलिसांच्या गाडीवर हल्ला

पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलकांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला केला. बदलापूर रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या गाड्या उभ्या होत्या. यावेळी आंदोलकांनी पोलिसांची गाडी उलटली. तसेच आणखी एका गाडीच्या काचा फोडल्या. गाड्यांची अवस्था पाहून आंदोलक किती आक्रमक होते याची जाणीव होत आहे. दरम्यान, बदलापूर रेल्वे स्थानकात सध्या सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशबंदी आहे. संपूर्ण बदलापूर स्थानकाला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.

आणखी वाचा : 

बदलापूर आंदोलनाचा मध्य रेल्वेला फटका, 30 लोकल गाड्या रद्द तर एक्सप्रेस खोळंबल्या

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Nashik Accident News : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात भीषण अपघात; संरक्षण कठडा तोडून इनोव्हा दरीत कोसळली, पाच जण ठार असल्याची भीती
Adiwasi Land Rules: आदिवासींची जमीन खरेदी-विक्री करता येते का? कायदा नेमकं काय सांगतो? जाणून घ्या महत्वाची माहिती