मोठी खुशखबर! आता महाराष्ट्रात मिळणार मोफत वीज; “पहले आओ, पहले पाओ” तत्त्वावर सुरू होणार स्मार्ट योजना; जाणून घ्या संपूर्ण माहिती!

Published : Nov 04, 2025, 04:19 PM IST

Maharashtra Free Electricity Scheme: महाराष्ट्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बळ, दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी “महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) योजना” सुरू केली. पात्र कुटुंबांना घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवून २५ वर्षे मोफत वीज दिली जाईल. 

PREV
18
आता महाराष्ट्रात मिळणार मोफत वीज

Maharashtra Free Electricity Scheme: महाराष्ट्रातील लाखो वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी “महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) योजना” लागू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र घरांना २५ वर्षे मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे गरीब कुटुंबांचा वीजबिलाचा बोजा कमी होईलच, शिवाय सौरऊर्जेच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्नाची संधीही निर्माण होणार आहे. 

28
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये (Free Electricity Scheme Maharashtra)

५ लाख घरगुती वीजग्राहकांना मोफत वीजचा लाभ मिळणार.

घरांच्या छतावर बसवले जाणार १ किलोवॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प.

योजना “पहले आओ, पहले पाओ” या तत्त्वावर राबवली जाणार.

२५ वर्षे मोफत वीजपुरवठा आणि अतिरिक्त वीज विक्रीची संधी.

योजनेसाठी ६५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

38
कोण पात्र आहेत? (Eligibility for Free Electricity Scheme)

महावितरणच्या माहितीनुसार

सध्या १.५४ लाख वीजग्राहक दारिद्र्यरेषेखाली आहेत.

तर ३.४५ लाख ग्राहक आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांमध्ये मोडतात.

हे ग्राहक दरमहा १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरतात.

या सर्वांना या योजनेत प्राधान्य दिले जाणार आहे. 

48
स्मार्ट योजनेअंतर्गत लाभ काय?

या योजनेत प्रत्येक पात्र घराच्या छतावर १ किलोवॅट सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवला जाणार आहे.

यातून

दरमहा अंदाजे १२० युनिट वीज निर्मिती होईल.

१०० युनिटपर्यंत वीज स्वतःच्या वापरासाठी वापरता येईल.

उर्वरित वीज महावितरणला विकून अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल. 

58
केंद्र आणि राज्य सरकारचे अनुदान (Subsidy Details)

ग्राहक श्रेणी केंद्र सरकार अनुदान राज्य सरकार अनुदान एकूण मदत

दारिद्र्यरेषेखालील ग्राहक ₹30,000 ₹17,500 ₹47,500

आर्थिकदृष्ट्या दुर्बळ ग्राहक ₹30,000 ₹10,000 ₹40,000

अनुसूचित जाती / जमाती ग्राहक ₹30,000 ₹15,000 ₹45,000 

68
२५ वर्षांची मोफत वीज आणि सुरक्षित भवितव्य

महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांच्या मते, या योजनेमुळे राज्यातील गरीब कुटुंबांना २५ वर्षे मोफत वीजपुरवठा मिळणार आहे.

तसेच, केंद्र आणि राज्य अनुदानामुळे लाभार्थींना अत्यल्प हिस्सा भरावा लागेल. 

78
अर्ज कसा करावा? (How to Apply Online)

महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

“Maharashtra Rooftop Smart Scheme” या पर्यायावर क्लिक करा.

आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (आधार कार्ड, वीज बिल इ.).

पात्रतेनुसार अर्ज मंजूर झाल्यानंतर सौर प्रकल्प बसवण्याची प्रक्रिया सुरू होईल. 

88
महत्वाची माहिती

ही योजना “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर आहे.

त्यामुळे पात्र नागरिकांनी अर्ज प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories