मुंबई : राज्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. सातत्याने हवामान खात्याकडून कोकण-घाटमाथ्यासह अन्य जिल्ह्यांना यल्लो अलर्ट जारी केला जात आहे. अशातच आजचा पावसाचा अंदाज काय आहे हे सविस्तर जाणून घेऊया.
राज्यात काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता हवामानामध्ये पुन्हा पावसाला पोषक स्थिती निर्माण होत आहे. आज, ता. ३० जुलै, संपूर्ण विदर्भ, कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली असून, हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित महाराष्ट्रात ऊन-सावल्यांचा खेळ आणि हलक्याफुलक्या सरी अपेक्षित आहेत.
25
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला पुरक हवामान
वायव्य मध्य प्रदेश आणि त्याला लागूनच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. याच बरोबर, समुद्र सपाटीपासून ५.८ किमी उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थितीही कायम आहे. मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा गंगानगर, दिल्ली, सतना, दाल्तोंगंज, जमशेदपूर ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. अरबी समुद्र ते दक्षिण बांगलादेशापर्यंतही कमी दाबाचा प्रभाव जाणवत आहे.
35
मंगळवारचे तापमान
मंगळवारी (ता. २९ जुलै) सकाळपासूनच्या २४ तासांत कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्राच्या धरण क्षेत्रात रिमझिम सरी सुरु होत्या. उर्वरित भागात ढगाळ हवामान, अधूनमधून सरी, आणि ऊन-सावल्यांचा खेळ पाहायला मिळाला. यामुळे तापमानात घट झाली असून, बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. फक्त जेऊर येथे राज्यातील उच्चांकी ३१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
या जिल्ह्यांमध्ये जोरदार सरींची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
55
बाकी राज्यात काय?
उर्वरित राज्यात ढगाळ हवामान, काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. पावसाच्या या चक्रामुळे पुढील काही दिवस राज्यभर कमाल तापमानात घट आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.