Maharashtra Rain Update : राज्यात पावासाचा हाहाकार, जनजीवन विस्कळीत; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Published : Jul 06, 2026, 08:18 AM ISTUpdated : Jul 06, 2026, 08:22 AM IST
Maharashtra Rain Update

सार

महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. ठिकठिकाणी पावसामुळे घर कोसळणे, दरड कोसळणे किंवा लोकल सेवा बंद पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्यानेही अनेक भागांना अलर्ट जारी केला आहे. 

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शाळा, महाविद्यालयांना प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आले आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी दरड कोसळत आहेत. तसेच मुंबईची वाहतूक सेवेवरही मोठा परिणाम झाला आहे. लोकल सेवा ठप्प झाली आहे. 

राज्यातील पावसाची स्थिती 

हवामान खात्याकडून आज पालघर, ठाणे, सिंदुधुर्ग आणि रत्नागिरी जिल्हांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय कोकणातही पावसाचा जोर वाढलेला अशसणार आहे. रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपुर, गडचिरोली आणि विदर्भातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. सातारा घाटमाथ्याच्या येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. 

मिसिंग लिंकवर दरड कोसळली

मुंबई-पुणे महामार्गावरील खंडाळ्याला बाहेर पडणाऱ्या मिसिंग लिंकच्या येथे भुस्खलन झाले आहे. पहिल्या पावसातच मिसिंग लिंकची झालेली अवस्था पाहून नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. याशिवाय मिसिंग लिंकच्या रस्त्यावरही खड्डे पडल्याची स्थिती आहे.

 


मुंबई-पुणे वाहतूक बंद 
सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना सुरू आहेत. पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक बंद झाल्याची स्थिती आहे. यामुळे नागरिकांनी पुढील आदेशापर्यंत या मार्गावरुन प्रवास करणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. 



मानखुर्दमध्ये घर कोसळून ५ बालकांसह ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
मुंबईतील मानखुर्द भागात जनता नगर परिसरात रविवारी दुर्घटना घडली. यामध्ये जनता नगर परिसरात असलेल्या तीन मजली कच्च्या चाळीतील २ ते ३ घरे अचानक कोसळली. या दुर्घटनेत ५ लहान मुले आणि एका महिला अशा ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर एकजण जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

तळेगाव दाभाडे येथे रस्त्याखालून आलं पाणी, नेमकं सत्य काय आहे?
Sanjay Raut : 'त्यांच्या प्रकृतीबरोबर महाराष्ट्राच्या प्रकृतीलाही आराम पडो', संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंना टोला