Maharashtra Rain Update : राज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट

Published : Jun 26, 2026, 08:42 AM IST
Maharashtra Rain Update

सार

Maharashtra Rain Update : राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील काही भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचे अखेर आगमन झाले आहे. ठिकठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज (26 जून) कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी बरसणार आहेत. अन्य भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. याशिवाय 23 जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.

पावसाचा जोर वाढला

राज्यात पावसाचा जोर गेल्या दोन दिवसांपासून वाढला गेला आहे. यामुळे नागरिकांना कडाक्याच्या उन्हापासून दिलासा मिळाला आहे. तर पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकणातील पावसाचा अंदाज

कोकण किनारपट्टीतही मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि मुंबई या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

मराठवाड्यातील स्थिती

मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येथे 30-40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

 

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Hingoli News : NEET पुनर्परीक्षा | तरुणाने आयुष्य संपवलं, आईसाठी ३३ सेकंदाचा व्हीडिओ मेसेज
Pune Ketan Lohagad Case : केतन जिवंत आहे, ती घाबरेल म्हणून खोटं सांगितलं; पण यानंतर सिया...