Pune Ketan Lohagad Case : केतन जिवंत आहे, ती घाबरेल म्हणून खोटं सांगितलं; पण यानंतर सिया...

Published : Jun 25, 2026, 04:50 PM IST
Pune Ketan Agarwal Lohagad Case

सार

केतन अग्रवालला त्याच्याच होणाऱ्या पत्नीने १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरुन दरीत ढकलून संपवलं. त्यादिवशी एका प्रत्यक्षदर्शी पोलीस अधिकाऱ्याने सियाला केतन जिवंत असल्याचं सांगितलं. पण हे ऐकून तिची प्रतिक्रिया अतिशय आश्चर्यकारक होती अशी माहिती प्रत्यक्षदर्शी पोलीस अधिकाऱ्याने दिली.

पुणे : पुण्यातील २६ वर्षीय केतन अग्रवाल या तरुण व्यावसायिकाची त्याच्या होणाऱ्या पत्नीने लोहगड किल्ल्यावरुन ४०० फूट खोल दरीत ढकलून त्याची हत्या केली. त्यानंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. केतनची होणारी पत्नी सिया गोयलचा क्रूर चेहरा घटनास्थळी असलेल्या एका अधिकाऱ्याने, प्रत्यक्षदर्शीने जगासमोर आणला आहे.

१८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरुन केतनला खाली दरीत ढकलल्यानंतर सियाने आरडाओरड केली. त्यावेळी तिथे एका किल्ल्यावर तैनात असलेले पोलीस अधिकारी यांनी सांगतलं, की सुरुवातीला केतन जिवंत असल्याचं सियाला सांगितलं. पण त्यावेळी तिची प्रतिक्रिया पाहून आश्चर्य वाटलं होतं.

केतन खाली पडल्याची माहिती सियाने दिल्यानंतर लगेच आम्ही दरीत उतरण्यास सुरुवात केली. खाली दरीत केतन रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला होता. गंभीर दुखापतीमुळे त्याचा तिथेच मृत्यू झाला आहे मला समजलं होतं. पण वर सिया एकटीच होती. तिला मोठा धक्का बसू नये म्हणून मी परत वर येत सियाला 'केतन अजूनही जिवंत आहे', असं खोटं सांगितलं.

ज्यावेळी केतन जिवंत असल्याचं तिला सांगितलं, त्यावेळी ती अतिशय अस्वस्थ झाली. तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. होणाऱ्या पत्नीकडून दिलासादायक प्रतिक्रिया न येता ती खूप घाबरली, हादरलेली दिसत होती. केतन जिवंत असेल, वाचला असेल तर तो सगळं सांगेल हीच भीती तिच्या चेहऱ्यावर दिसत होती, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शी पोलीस अधिकाऱ्याने दिली.

केतनच्या वडिलांचीही प्रतिक्रिया

केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनीही सियाच्या चेहऱ्यावरील भाव ओळखले होते. त्यांनी याबाबत बोलताना सांगितलं, की ज्यावेळी केतनचा मृतदेह घरी आणला त्यावेळी सिया शांत होती, तिच्या चेहऱ्यावर जराही दु:ख दिसत नव्हतं.

सध्या सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस त्या प्रत्यक्षदर्शी पोलीस कर्मचाऱ्याचे दावे, सीसीटीव्ही फुटेज, कुटुंबीयांनी केलेले आरोप असा सर्वच बाबींनी तपास करत आहेत.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Abhijeet Dipke: आजीचं निधन, तरीही अभिजीत डिपके पोलिसांच्या ताब्यात; CJP कडून सुटकेची मागणी
Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल