Kalaram Temple : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळाराम मंदिराचे घेतले दर्शन, प्रभू श्री रामाच्या भक्तीत झाले तल्लीन

Nashik Kalaram Temple : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये पूजा केली. यादरम्यान त्यांनी एआयच्या (AI) मदतीने रामायणातील युद्ध कांडाचे पठण ऐकले.

Nashik Kalaram Temple : पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी रोजी अयोध्येतील श्री राम मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. या सोहळ्याच्या 11 दिवसांपूर्वी म्हणजे शुक्रवारी (12 जानेवारी 2024) पंतप्रधानांनी नाशिकमधील काळाराम मंदिरात पूजा करून विशेष अनुष्ठान सुरू केले.

काळाराम मंदिरामध्ये (Nashik Kalaram Temple) पूजा करताना पंतप्रधान मोदी प्रभू श्री राम यांच्या भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. गोदावरी नदीच्या तीरावर पंचवटी परिसरामध्ये हे मंदिर आहे. प्रभू श्री राम यांनी वनवासातील बराच काळ पंचवटीमध्ये घालवला आहे. रामायणाशी संबंधित स्थानांमध्ये पंचवटीलाही विशेष महत्त्व आहे. रामायणातील अनेक महत्त्वाच्या घटना येथे घडल्या.

प्रभू राम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी पंचवटी परिसरातील दंडकारण्य वनामध्ये काही वर्षे वास्तव्य केले होते. पंचवटी या शब्दाचा अर्थ म्हणजे पाच वटवृक्षांची जमीन. प्रभू राम यांनी येथे आपली कुटी स्थापित केल्याची आख्यायिका आहे. पाच वटवृक्षांमुळे हा परिसर मंगलमय झाल्याचे म्हटले जाते.

पंतप्रधानांनी युद्ध कांडाचे पठण ऐकण्यासाठी AIची घेतली मदत

काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामायणाची कथा ऐकली. यावेळी विशेषतः 'युद्धकांड' या खंडाचे पठण करण्यात आले. यामध्ये भगवान राम अयोध्येला परत आल्याचे वर्णन करण्यात आले आहे. युद्ध कांडाचे पठण मराठी भाषेमध्ये करण्यात आले. युद्ध कांडाचे पठण हिंदी भाषेमध्ये ऐकण्यासाठी पंतप्रधान मोदींनी यावेळेस एआयची (AI) मदत घेतली.

आणखी वाचा : 

Yuva Mahotsav : युवा दिनानिमित्त नरेंद्र मोदींनी नाशिकमध्ये तरुणांना दिला हा मोलाचा सल्ला, वाचा पंतप्रधानांच्या संभाषणातील महत्त्वाचे मुद्दे 

राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आजपासून 11 दिवस विशेष अनुष्ठान, ऑडिओ संदेशात जनतेला दिला खास संदेश

Atal Setu : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार अटल सेतूचे उद्घाटन, जाणून घ्या खासियत

Share this article