Police Bharti 2025: राज्यात 15,631 पोलीस आणि कारागृह शिपाई पदांसाठी भरतीला मंजुरी, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Published : Aug 20, 2025, 08:29 PM IST

Police Bharti 2025: महाराष्ट्रात पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई संवर्गातील १५,६३१ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भरतीला मंजुरी दिली. 

PREV
16

मुंबई : महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे! राज्यात पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई संवर्गातील तब्बल 15,631 रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भरतीला मंजुरी देत शासन निर्णय जारी केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी असून, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही भरती अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

26

या कालावधीत झालेल्या रिक्त पदांची भरती

या भरतीसाठी 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त झालेली आणि होणारी पदे समाविष्ट असतील. १२ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता, आणि त्याला मंजुरीही मिळाली आहे.

भरली जाणारी पदसंख्या पुढीलप्रमाणे

अनुक्रमांक पदनाम रिक्त पदसंख्या

1 पोलीस शिपाई 12,399

2 पोलीस शिपाई (चालक) 234

3 बॅण्डस्मन 25

4 सशस्त्र पोलीस शिपाई 2,393

5 कारागृह शिपाई 580

एकूण 15,631

36

१००% पदे भरण्यास मंजुरी, OMR पद्धतीने परीक्षा

या भरतीसाठी १०० टक्के पदे भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. वित्त विभागाच्या नियमांमध्ये विशेष शिथिलता देत पोलीस भरतीला मंजुरी मिळाली आहे. या भरतीसाठी OMR पद्धतीने लेखी परीक्षा घेण्यासही मान्यता देण्यात आली आहे, ज्यामुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमतेला प्राधान्य दिलं जाणार आहे.

46

उमेदवारांसाठी दिलासा

राज्यातील अनेक तरुण पोलीस भरतीसाठी दीर्घकाळापासून तयारी करत होते. आता त्यांना शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. घटकस्तरावर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याने जलद गतीने आणि अधिक पारदर्शक पद्धतीने भरती पूर्ण होण्याची शक्यता आहे.

56

महत्त्वाच्या बाबी

भरती प्रक्रिया 2024-25 मध्ये राबवली जाणार

सामान्य प्रशासन विभागाच्या पूर्वीच्या अटींमध्ये शिथिलता

राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही भरती अत्यावश्यक

66

आता वेळ आहे संधीचं रूपांतर यशात करण्याची! जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. आता अधिक जोमाने तयारी सुरू करा!

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories