पुण्यातील या चार टोल प्लाझांवर फास्टॅग वार्षिक पासची सुरवात, केवळ 3 हजार रुपयांत वर्षभर प्रवास!

Published : Aug 20, 2025, 01:12 PM IST

पुणे - फास्टॅग वार्षिक पास योजना पुणे जिल्ह्यातील चार टोल प्लाझांवर सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना एकदा पास घेतल्यावर येथून सहज प्रवास करता येणार आहे. सध्या केवळ कार, जीप आणि व्हॅनसारख्या वाहनांसाठी हा पास देण्यात येत आहे.

PREV
14
योजना १५ ऑगस्टपासून लागू

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) पुणे जिल्ह्यातील चार टोल प्लाझांवर, खेड शिवापूर, पाटस, सरडेवाडी आणि चालक्कवाडी फास्टॅग वार्षिक पास योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही योजना १५ ऑगस्टपासून लागू झाली असून, ती केवळ कार, जीप आणि व्हॅनसारख्या अव्यावसायिक वाहनांसाठी लागू आहे.

24
एक वर्ष अथवा २०० सिंगल ट्रिप्स

एनएचएआय प्रकल्प संचालक, पुणे यांच्या माहितीनुसार, वार्षिक टोल (फास्टॅग) पास एक वर्ष अथवा २०० सिंगल ट्रिप्स (जे आधी पूर्ण होईल ते) इतक्या कालावधीसाठी वैध राहणार आहे. या पाससाठी ₹३,००० इतका खर्च असून तो फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गावरील टोल प्लाझांवरच लागू होईल.

34
असा करा अर्ज

या उपक्रमाचा उद्देश रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा आर्थिक बोजा कमी करणे तसेच टोल प्लाझांवरून सुलभ व जलद वाहतूक सुनिश्चित करणे हा आहे. वार्षिक पास मिळविण्यासाठी वाहनधारक ‘राजमार्ग यात्रा’ या मोबाईल अॅपवरून किंवा एनएचएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात. हाच पर्याय नूतनीकरणासाठीही उपलब्ध असून अधिक माहितीसाठी नागरिकांनी १०३३ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

44
हजारो नागरिकांना होणार फायदा

फास्टॅग वार्षिक पास हा खासगी वाहनांसाठी तयार करण्यात आलेला प्रीपेड प्रणाली आहे, जी नियमित प्रवाशांसाठी किफायतशीर पर्याय ठरत आहे. टोल भरण्याची प्रक्रिया सुलभ केल्यामुळे या योजनेचा लाभ पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर सतत प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना होणार आहे.

Read more Photos on

Recommended Stories