मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या घोषणेची तात्काळ अंमलबजावणी करा अशी मागणी खासदार डॉ फौजिया खान यांनी केली. शिक्षणाचा खर्च झेपत नसल्याने मुलींच्या आत्महत्या होत असल्याचे त्या म्हणाल्या.
राज्यभरातील मुलींना मोफत शिक्षक देण्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी केली होती. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. यामुळेच राज्यात शिक्षणाचा खर्च झेपत नसल्याने मुलींच्या आत्महत्या होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार डॉ. फौजिया खान यांनी केलाय. तात्काळ या घोषणेची अंमलबजावणी करावी अशी मागणी राष्ट्रवादी फौजिया खान यांनी केली.
घोषणेची अंमलबजावणी न केल्यास राज्यभर राष्ट्रवादी आंदोलन करणार
शिक्षणाचा खर्च झेपत नसल्याने परभणीच्या आहेरवाडी आणि लातूर मधील विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील आहेरवाडी येथील दीपिका खंदारे या मुलीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या कुटुंबाला भेट देऊन खासदार फौजिया खान यांनी सरकारला लक्ष केले आहे. लवकरात लवकर या घोषणेची अंमलबजावणी केली गेली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार असल्याचेही खान यांनी म्हटले आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे नेते विजय गव्हाणे यांनी या घोषणेच्या अनुषंगाने सरकारवर टीका केली.
आणखी वाचा :