Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार, महायुतीकडून इलेक्शन प्लॅन तयार

Published : Oct 08, 2025, 08:29 AM IST
Maharashtra

सार

Maharashtra : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

Maharashtra : राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या फटकारीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान या ‘मिनी विधानसभा’ निवडणुका होण्याची चिन्हं आहेत. सत्ताधारी महायुतीने (शिंदे, फडणवीस आणि अजित पवार) आधीच रणनिती आखायला सुरुवात केली असून, स्वराज्य संस्थांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मोठा इलेक्शन प्लॅन तयार केला आहे. दुसरीकडे, ठाकरे गट आणि मविआ या रणनीतीला कसे उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महायुतीचा इलेक्शन प्लॅन तयार

  • महायुतीने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पातळीवर तीन मंत्र्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री आणि दोन्ही पक्षांचे आमदार व नेते समितीत असतील.
  • जिल्हा पातळीवरील समित्यांची घोषणा आज होण्याची शक्यता आहे.
  • ही समिती आठ दिवसांत जिल्ह्यांतील राजकीय परिस्थिती, स्थानिक शक्तिसंतुलन आणि अंतर्गत वादांचा सविस्तर अहवाल सादर करेल.
  • हा अहवाल राज्य समितीकडे सादर करण्यात येईल आणि मुख्य नेते तणावग्रस्त जागांवर निर्णय घेतील.
  • राज्य समन्वय समिती हे सुनिश्चित करणार आहे की कोणत्याही ठिकाणी जाहीरपणे तणाव निर्माण होऊ नये.

जिल्हा पातळीवरील गणित आणि रणनीती

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुतीने जिल्हा पातळीवरील समीकरणांचा सखोल अभ्यास सुरू केला आहे. या समित्यांमध्ये जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार आणि पक्षनेते असतील. ते जिल्ह्यातील परिस्थिती, महायुतीच्या पक्षांची ताकद आणि जनतेतील प्रतिमा यांचा आढावा घेतील.

पुढील आठ दिवसांत जिल्हा समितीचा अहवाल राज्य समितीपुढे सादर केला जाईल. या अहवालाच्या आधारे महायुतीचे मुख्य नेते अंतिम निर्णय घेतील आणि वादग्रस्त जागांवरील उमेदवार निश्चित करतील.

निवडणुकींच्या तारखा आणि शक्यता

राज्यात नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार —

  • नगरपरिषद निवडणुका: १५ ते २० नोव्हेंबरदरम्यान
  • जिल्हा परिषद निवडणुका: १५ ते २० डिसेंबरदरम्यान

या कालावधीत निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही गटांकडून प्रचार आणि रणनीतीचे नियोजन वेगाने सुरू झाले आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Indigo Update : आजही शुक्रवारी शेकडो उड्डाणे रद्द, मुंबई-पुणे-नागपूरसह प्रमुख विमानतळांवर गोंधळ
माझो वरली महागडी गं, रिअल इस्टेटमध्ये न्यूयॉर्कच्या लोअर मॅनहॅटनशी होतेय तुलना, अपार्टमेंटची किंमत 1 लाख रुपये प्रति चौरस फूट