
Maharashtra Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रमुख आणि प्रभारींची घोषणा केली आहे. बीड जिल्ह्यात आमदार सुरेश धस यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, मंत्री पंकजा मुंडे यांना निवडणूक प्रभारीची जबाबदारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर धस आणि मुंडे यांच्यात मतभेद निर्माण झाले होते, मात्र आता स्थानिक निवडणुकीत दोघांनाही एकत्रितपणे पक्षासाठी काम करावं लागणार आहे.
भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत ठाणे जिल्हा आणि परिसरात मोठी जबाबदारी मंत्री गणेश नाईक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ते ठाणे शहर, ग्रामीण भाग, कल्याण, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, भिवंडी आणि नवी मुंबई या सर्व ठिकाणांचे निवडणूक प्रभारी असतील. हा प्रदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भाजपकडून खालीलप्रमाणे नेत्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत –
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच भाजपने राज्यभरात तयारी सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात प्रमुख आणि प्रभारी नेमून पक्ष संघटन मजबूत करण्यास आणि प्रचाराची दिशा ठरवण्यास सुरुवात झाली आहे.