अटक वॉरंट जारी, मनोज जरांगे पाटील पुण्यात हजर राहणार

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. ते 2 ऑगस्ट रोजी पुण्याच्या न्यायालयात हजर राहणार आहेत.

Rameshwar Gavhane | Published : Jul 31, 2024 8:48 AM IST / Updated: Jul 31 2024, 02:21 PM IST

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप मनोज जरांगेंवर करण्यात आला आहे. या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला मनोज जरांगे पाटील कोर्टात हजर राहणार आहेत. 2 ऑगस्टला पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर मनोज जरांगे पाटील हजर राहणार आहेत. न्यायालयात हजर राहण्यासाठी मनोज जरांगे पाटील गुरुवारी पुण्याकडे निघणार आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी हे वॉरंट काढलं आहे. अटक वॉरंट काढल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे देखील अॅक्शन मोडमध्ये आहेत. न्यायालयात हजर राहण्यासाठी मनोज जरांगे पाटील गुरुवारी दुपारी पुण्याकडे निघणार आहेत.

नेमकं प्रकरण आहे तरी काय?

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप मनोज जरांगेंवर करण्यात आला आहे. त्यानंतर मनोज जरांगेंना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र दिलेल्या तारखेला हजर न राहिल्याने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटकच वॉरंट काढले होते. छत्रपती संभाजीराजे यांच्या नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक आणि अपहार केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

मनोज जरांगे पाटील गुरुवारी पुण्याला येणार

मनोज जरांगे पाटील आणि आणखी दोघांच्या विरोधात याबाबत वारजे येथील धनंजय घोरपडे यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले होते. मात्र आंदोलनामुळे जरांगे पाटील न्यायालयात हजर राहिले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. गुरुवारी जालन्यातून पुण्याला जाण्यासाठी मनोज जरांगे पाटील निघतील. त्यानंतर पुण्यातील न्यायालयात नेमकं काय घडतं? जारी करण्यात आलेल्या अटक वॉरंटचं पुढे नेमकं काय होतं हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

आणखी वाचा :

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी!, पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचा आज शेवटचा दिवस

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, वर्षाला 3 गॅस सिलेंडर मिळणार मोफत

खडकवासला, पानशेत धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु, पुण्यात परत येणार महापूर?

 

 

Share this article