Rain Alert : कोकणात येत्या 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता, एनडीआरएफची टीम तैनात

Rain Alert : कोकणात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर असून एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे.

 

Rameshwar Gavhane | Published : Jun 22, 2024 2:00 PM IST / Updated: Jun 22 2024, 07:33 PM IST

Rain Alert : महाराष्ट्रात आज आणि उद्या विजांच्या कडाकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. कोकणात बहुतेक ठिकाणी, मराठवाड्यात अनेक ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज तर उद्या मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

कोकणात जोरदार पावसाची हजेरी

रायगड जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार झाला आहे.  रायगड, रत्नागिरीसह कोकणात पुढील दोन दिवस आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाडमध्ये एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे.

आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी अलर्ट मोडवर

खेडमध्ये मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीचं पाणी इशारा पातळीच्या वर पोहोचले असून यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी अलर्ट मोडवर आहेत. खेड शहरात सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीला पूर आला आहे. त्यामुळे सध्या जगबुडी नदी इशारा पातळीच्या वरुन वाहत आहे. पावसाचा जोर कायम राहण्यास खेड शहराच्या अगदी बाजूने वाहणारी ही नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांनी नदीकाठी विनाकारण फिरू नये, असं आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 आणखी वाचा :

Manoj Jarange Health Update : मनोज जरांगेंची ECG तपासणी सुरू, दगदग वाढल्याने तब्येत खालावली

 

 

 

 

Share this article