Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात धो-धो पावसाचा इशारा देण्यात आला असून, हवामान विभागाने ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबई : राज्यात पुढील 4, 5 आणि 6 सप्टेंबर रोजी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये धो-धो पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
27
कोणत्या भागांमध्ये किती अलर्ट?
ऑरेंज अलर्ट (4 सप्टेंबर):
कोकण विभाग: पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी
मध्य महाराष्ट्र: पुण्याचा घाट भाग, कोल्हापूरचा घाट भाग, नाशिक आणि घाट भाग, धुळे, नंदुरबार
37
यलो अलर्ट (4 सप्टेंबर)
कोकण: सिंधुदुर्ग
मध्य महाराष्ट्र: पुणे शहर, साताऱ्याचा घाट भाग, अहिल्यानगर (नगर), जळगाव
4 सप्टेंबर: कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता
5 सप्टेंबर: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर राहणार
6 सप्टेंबर: विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता
57
मुंबई आणि कोकणात काय स्थिती?
मुंबईत ढगाळ हवामानासह अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणातील इतर जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे, रस्ते बंद होणे, वाहतूक खोळंबणे अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
67
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
हवामान विभागाच्या अलर्टनुसार प्रवास आखा
नदीनाल्यांपासून दूर राहा
स्थानिक प्रशासनाच्या सूचना पाळा
शाळा, कार्यालये, सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पर्यायी योजना तयार ठेवा
77
महत्त्वाची सूचना
राज्यातील बऱ्याच भागांमध्ये जोरदार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने, शेतकरी, वाहनचालक, नागरिक आणि पर्यटनस्थळी जाणारे पर्यटकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.