जर तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीतील कोणासोबतही अनुचित प्रकार घडला असेल, तर या पद्धतीचा अवलंब करा.
राज्य सरकारच्या अधिकृत 'महिला सन्मान पोर्टल'ला भेट द्या.
मुख्य पृष्ठावर असलेल्या 'तक्रार नोंदवा' या पर्यायावर क्लिक करा.
विचारलेली आवश्यक माहिती आणि घडलेल्या घटनेचा सविस्तर तपशील भरा.
तक्रार 'सबमिट' केल्यानंतर तुम्हाला एक युनिक आयडी (Unique ID) मिळेल.
या आयडीचा वापर करून तुम्ही तुमच्या तक्रारीची सद्यस्थिती (Status) कधीही तपासू शकता.