Ram Mandir Pran Pratishtha : 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, रिलायन्सनेही केलीय ही घोषणा

Published : Jan 20, 2024, 10:23 AM ISTUpdated : Jan 20, 2024, 10:27 AM IST
public holiday

सार

22 जानेवारीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. अशातच महाराष्ट्र सरकारने प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली आहे.

Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त केंद्रासह देशातील काही राज्यांनी सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारनेही येत्या 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय मध्य प्रदेशात(Madhya Pradesh) प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी शाळा बंद राहणार आहेत.

रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा भव्यदिव्य होणार असल्याने खासगी कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने देखील 22 जानेवारीला सुट्टीची घोषणा केली आहे.

महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पाहता महाराष्ट्र (Maharashtra) सरकारने 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. भाजप पक्षाचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकार समोर ठेवला होता. राज्य सरकारने मंगल प्रभात लोढा यांचा प्रस्ताव स्विकारत राज्यात सुट्टीची घोषणा केली आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीने केली सुट्टीची घोषणा
देशातील सर्वाधिक मोठे उद्योगपती मुकेश अंबांनी (Mukesh Ambani) यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेवेळी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) कर्मचाऱ्यांना सुट्टी दिल्याचे जाहीर केले आहे. यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीअंतर्गत येणाऱ्या सर्व कंपन्या 22 जानेवारीला कामकाज करणार नाहीत.

मध्य प्रदेशात शाळा बंद राहणार
मध्य प्रदेश सरकारने राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शाळांसह महाविद्यालयेही बंद राहणार आहेत. संपूर्ण देशात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा दिवाळीप्रमाणे साजरा केला जाणार आहे. केंद्र सरकारसह काही राज्यांनी अर्धा दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यातही दुपारनंतर अर्धा दिवस सुट्टी असणार आहे.

आणखी वाचा : 

Ram Mandir Pran Pratishtha : पंतप्रधान मोदींचे 11 दिवसांचे अनुष्ठान, सर्व विधींचे काटेकोरपणे करताहेत पालन

'मंदिरांना रोषणाई करा, स्वच्छता अभियान चालवा', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

20 किलो Parle G बिस्किटांचा वापर करुन साकारण्यात आलेय राम मंदिर, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

PREV

Recommended Stories

Nashik Accident News : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात भीषण अपघात; संरक्षण कठडा तोडून इनोव्हा दरीत कोसळली, पाच जण ठार असल्याची भीती
Adiwasi Land Rules: आदिवासींची जमीन खरेदी-विक्री करता येते का? कायदा नेमकं काय सांगतो? जाणून घ्या महत्वाची माहिती