Maharashtra Election 2024: शरद पवार यांनी फडणवीसांवर केली कडव्या शब्दांत टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सभांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी 400 पारच्या घोषणेवरून संविधानातील बदल करण्याचा आरोप केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या सभांना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिसत आहे. त्यांच्या सभांना जनता मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देताना दिसत आहे. यावेळी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी मान तालुकयातील प्रचारसभेत बोलताना अशा प्रकारची फडणवीसांवर जोरात हल्ला चढवला आहे. 

शरद पवार काय म्हणाले? -

आताचे पंतप्रधान 400 पारची घोषणा देत होते. याचा अर्थ जाणून घेतला. त्यांना एकतर संविधानामध्ये बदल करायचा असेल किंवा डॉक्टर बाबासाहेबांची घटना बदलायची असेल. यासाठीच चारशे पारचा नारा दिला जात होता. यासाठी आम्ही लोकसभेत निवडून आल्यानंतर एकत्र येऊन घटनेला धक्का लावायचा नाही यासाठी निर्णय घेतला. आपल्या भागातील प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्या हातात अधिकार पाहिजेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीसांना काय म्हटले? - 

महाराष्ट्रातील महिला आणि मुली बेपत्ता देखील झाल्या आहेत. एका बाजुला लाडकी बहीण म्हणायचं दुसरीकडे संरक्षणाबाबत काही निर्णय घ्यायचा नाही. अशा सर्व गोष्टीवर एकत्र येऊन नियंत्रण आणण्याची गरज आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही गंभीर बाब आहे. नुसत्या एमआयडीसीने सर्व प्रश्न सुटत नाहीत, आपल्या सर्वांची साथ आवश्यकता आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

Read more Articles on
Share this article