Maharashtra Election 2024: करवीर विधानसभेतील उमेदवार संताजी घोरपडेंवर हल्ला

Published : Nov 18, 2024, 09:48 AM IST
santaji ghorpade

सार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीर मतदारसंघातील उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. बैठकीनंतर परतत असताना अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली आहे.

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रात जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आणि कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. काल रात्री बैठक आटोपून परतत असताना 6-7 अज्ञातांनी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यांची गाडी अडवून दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात घोरपडे यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली. रात्रीच्या अंधारात हल्लेखोर पळून गेले.

घोरपडे यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी काळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. निवडणुकीला १ दिवस बाकी असताना अशा प्रकारच्या घटनेमुळे वातावरण ढवळून निधाले आहे. आता याप्रकरणी पुढं काय होत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

PREV

Recommended Stories

Nashik Municipal Election 2026 : मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कडक वाहतूक निर्बंध; ‘स्ट्राँग रूम’ परिसरातील रस्ते बंद
Maharashtra Municipal Elections : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपूर–नाशिकमध्ये तणाव; हल्ला व अपहरण प्रकरणामुळे खळबळ