Maharashtra Election 2024: भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय दिली आश्वासनं?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात महिलांसाठी लाडकी बहिण योजनेअंतर्गत २१०० रुपये, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि सन्मान योजनेत १५ हजार रुपये अशी अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. 

Maharashtra Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना मोठ्या प्रमाणावर चर्चेला ऊत आले आहे. राज्यात एकाच टप्यामध्ये २० नोव्हेंबरला निवडणूक होणार असून २३ मतमोजणी होणार आहे. यावेळी भाजपाकडून त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पियुष गोयल, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांसह भाजपचे अनेक नेते उपस्थितीत होते.

भाजपाने पाच वर्षांसाठी काय दिली आश्वासने - 
भाजपाने पाच वर्षांसाठी मोठी आश्वासने दिली आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपये देण्यात येणार आहे. या संकल्पपत्रात महिला, विद्यार्थी, वृद्ध यांच्यावर भर देण्यात आला आहे. त्यासोबतच यात रोजगार, व्यवसाय यांसह विविध मुद्द्यांवरही भर देण्यात आला आहे. 

भाजपच्या संकल्पपत्रातील महत्त्वाच्या घोषणा -

Read more Articles on
Share this article