राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना राबवण्यात आली आणि आता ती परत चर्चेत आली आहे. कोल्हापूर येथील राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक त्यांच्या वक्तव्यामुळे परत चर्चेत आले आहेत. धनंजय महाडिक यांच्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. धनंजय महाडिक यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर याबद्दल माफी मागितली आहे.
काय म्हणाले धनंजय महाडिक? -
या योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत किंवा सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढा. ते फोटो आम्हाला पाठवा, म्हणजे आम्ही त्यांची व्यवस्था करू, असं धनंजय महाडिक यांनी म्हटलं आहे. यावर प्रणिती शिंदे यांनी याबद्दल त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी सभेमध्ये लाव रे तो व्हिडीओ असं म्हणून धनंजय महाडिक यांचा व्हिडीओ दाखवला आणि त्याबद्दल त्यांनी टीका केली आहे.
त्या बोलताना म्हणाल्या की, "ही तुमची भाषा आहे का? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र म्हणत प्रणिती शिंदे यांनी धनंजय महाडिक आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीने यावेळी धनंजय महाडिक यांच्यावर टीका केली आहे.