उबाठा नेते संजय राऊत यांनी शिंदेंवर बॅगेतून पैसे आणत असल्याचा आरोप करत ट्विट केले होते. यावर त्यांनी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाला धारेवर धरले. मात्र यावेळी खबरदारी म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅगेची झाडाझडती घेतली.
नाशिक लोकसभा मतदार संघात हेमंत गोडसे यांच्या प्रचारानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशकात दाखल झाले असता त्यांच्या बॅगांची झाडाझडती घेण्यात आली.यावरून आता नवीनच चर्चाना सुरु झाल्या आहेत. मागच्या वेळी उबाठा नेते संजय राऊत यांनी शिंदेंवर बॅगेतून पैसे आणत असल्याचा आरोप करत ट्विट केले होते. यावर त्यांनी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाला धारेवर धरले. मात्र यावेळी खबरदारी म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅगेची झाडाझडती घेतली.
संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर रोष :
मागच्या वेळी नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी हेलिकॉप्टरने आले होते. त्यावेळी त्यांच्या बरोबर त्यांचे सुरक्षा रक्षकही हेलिकॉप्टरमधून बाहेर आले. त्यांच्या हातात बॅगा दिसल्या होत्या. त्यावरून उबाठानेते खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप करत मुख्यमंत्री शिंदे सह निवडणूक आयोगाला घेरले होते. मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले म्हणत त्यांनी ट्वीट देखील केले होते. यावरून एकच खळबळ उडाली होती.याची देखल घेत आज निवडणूक आयोगाने बॅगांची तपासणी केली आहे.
संजय शिरसाठ यांनी राऊतांचे आरोप फेटाळले होते :
शिवसेना (एकनाथ शिंदे) प्रवक्ते संजय शिरसाट यांनी राऊत यांचा दावा फेटाळून लावला होता. मुख्यमंत्र्यांच्या बॅगेत कपडे असल्याचे त्यांनी सांगितले होते. जेव्हा एखादा नेता अशा दौऱ्यावर जातो तेव्हा तो सोबत कपड्यांनी भरलेली बॅग घेऊन जातो.त्यामुळे राऊतांनी केलेले आरोप साफ खोटे आहेत.
पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ जागांवर होणार मतदान :
महाराष्ट्रातील लोकसभेच्या १३ जागांसाठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, भूषण पाटील आणि उज्ज्वल निकम हे या टप्प्यातील प्रमुख उमेदवार आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. धुळे, दिंडोरी, नाशिक, कल्याण, पालघर, भिवंडी, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि मुंबई दक्षिण या १३ जागांवर मतदान होणार आहे.