शरद पवारांचं भाषण सुरू असतानाच वादळी वाऱ्याने व्यासपीठावर बॅनर कोसळला, सुदैवाने दुर्घटना टळली

Published : May 16, 2024, 03:46 PM IST
sharad pawar

सार

शरद पवारांच्या सटाणामधील सभेत भाषण सुरू असताना बॅनर कोसळल्याची दुर्घटना घडली. सटाण्यात शरद पवार यांचे भाषण सुरू असताना वादळी वारे सुटले होते, या वाऱ्यामुळे सभेच्या व्यासपीठावरील बॅनर कोसळत होता. 

मुंबईतील घाटकोपर येथे महाकाय बॅनर कोसळून मोठी दुर्घटना झाली. आता, पुन्हा एकदा बॅनर कोसळल्याची घटना घडली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सटाणा सभा सुरू असताना सोसाट्याचा वारा सुरू झाला. मात्र, तरीही पवारांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं होतं. मात्र, यावेळी, व्यासपीठावरील बॅनर कोसळल्याची घटना घडली.

सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही जखम झाली नाही. व्यासपीठावर जे कार्यकर्ते होते, त्यांनी हा बॅनर वरचेवरच घेतल्याने अनर्थ टळला. मात्र, बॅनर कोसळल्याची घटना समजाच शरद पवारांनी आपले भाषण उरकते घेतले.

शरद पवारांच्या भाषणातील मुद्दे :

महाराष्ट्राच्या विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न, या भागातील प्रश्न मांडले जायचे. उत्तम शेती कशी करायची हे या भागातील शेतकऱ्यांनी दाखवून दिले. नाशिकचा नावलौकिक त्यामुळेच सर्वत्र वाढल्याचे सांगत शरद पवारांनी सटाण्यातील भाषणाला सुरुवात केली. देशात सध्या मोदी राज्य आहे.,विविध जिल्ह्यात आज कांद्याचा प्रश्न महत्वाचा आहे. मात्र, कांद्याची निर्यात केंद्र सरकारने बंद केली आहे. ज्यांच्या हातात सत्ता असते, कांद्यावरील निर्यातबंदी उठवायची ही त्यांचीच जबाबदारी असते. पण, या सरकारला सहन होत नाही. आमचे राज्य होते तेव्हा भाजपचे लोक कांद्याच्या माळा घालून आले होते, शरद पवार होष मे आवो अशा घोषणा दिल्या. त्यावेळी, मी दिल्लीत गेलो अन् कांदा निर्यातबंदी उठवली होती. आताच्या सरकारला त्याची चिंता नाही. कांद्याला भाव नाही, द्राक्षाला भाव नाही, द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. मात्र, मोदी म्हणतात द्राक्ष,व डाळिंबाला भाव दिले, पंतप्रधान खोटे बोलतात आणि आमच्यावर टीका करत आहेत, असे पवार यांनी म्हटले.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Nashik Accident News : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात भीषण अपघात; संरक्षण कठडा तोडून इनोव्हा दरीत कोसळली, पाच जण ठार असल्याची भीती
Adiwasi Land Rules: आदिवासींची जमीन खरेदी-विक्री करता येते का? कायदा नेमकं काय सांगतो? जाणून घ्या महत्वाची माहिती