विधानसभेसाठी काँग्रेसची 48 उमेदवारांची पहिली लिस्ट जारी, पाहा कोणाला दिले तिकीट

महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदावारांची पहिली लिस्ट जारी करण्यात आली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला 288 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. जाणून घेऊया काँग्रेसच्या पहिल्या लिस्टमधील उमेदवारांबद्दल अधिक...

Maharashtra Assembly Election 2024 Congress List : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगत पाहायला मिळणार आहे. अशातच गुरुवारी (24 ऑक्टोबर) काँग्रेसने आपल्या पक्षातील उमेदवारांची पहिली लिस्ट जारी केली आहे. जाणून घेऊया कोणत्या नेत्याला कोठून तिकीट देण्यात आले आहे याबद्दल सविस्तर...

कोणाला कोठून दिलेय तिकीट?
काँग्रेसने गुरुवारी एकूण 48 उमेदवारांची लिस्ट जारी केली आहे. या लिस्टमध्ये नाना पटोले यांना साकोली, विजय वडेट्टीवार यांना ब्रम्हपुरी आणि विजय बाळासाहेब थोरात यांना संगमनेर येथून तिकीट देण्यात आले आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. 

लिस्टमध्ये चार मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले आहे. हे चारही उमेदवार मुंबई आणि ठाण्यातील आहेत. चारमधील तीन आधीच विधानसभा आणि एक विधान परिषदेचे सदस्य होते. काँग्रेसच्या लिस्टमध्ये चांदीवली येथून मोहम्मद आरिफ नसीम खान, मालाड पश्चिम येथून असलम शेख, मुंबा देवी येथून अमीन पटेल आणि मीरा-भायंदर येथून सैयद मुजफ्फर हुसैन यांना तिकीट दिले आहे. दरम्यान, नसीम खान चार वेळा आमदार राहिले होते. याशिवाय दोन वेळेस राज्य सरकारमध्ये मंत्रीपदाची धुराही सांभाळली होती. येथे पाहा लिस्ट…

जागा वाटपाचा तिढा सुटला…
महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की, काँग्रेस, शरद पवारांचा गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना 85-85-85 जागांवर निवडणूक लढवणार आहोत. अन्य 18 शिल्लक राहिलेल्या जागांसाठी समाजवादी पक्ष आणि आमच्या युतीमधील पक्षांसोबत चर्चा करू.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे शेड्यूल

आणखी वाचा : 

लाडकी बहीण योजना: महिलांच्या सक्षमीकरणाची एक नवा युग!

अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवणार, राष्ट्रवादीची ३८ उमेदवारांची यादी जाहीर

Share this article