प्रकाश सोळंके यांची राजकीय निवृत्ती जाहीर, कोण आहेत त्यांचे राजकीय वारसदार?

अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले असून आपल्या राजकीय वारसदाराचीही घोषणा केली आहे.

Rameshwar Gavhane | Published : Aug 5, 2024 5:13 AM IST

Prakash Solanke Announced His Political Retirement : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे जोरदार वारे वाहू लागले आहे. अद्याप निवडणुकांची घोषणा झालेली नसली, तरीदेखील प्रत्येक पक्षानं आपापल्या परीनं विधानसभेसाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. अनेक विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच अजित पवार गटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपली राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांनी आगामी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. 

राजकीय वारसदार म्हणून पुतण्या जयसिंह सोळंके यांच्या नावाची घोषणा

अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे आमदार प्रकाश सोळंके यांनी स्पष्ट केले असून आपल्या राजकीय वारसदाराचीही त्यांनी घोषणा केली आहे. आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय वारसदार म्हणून पुतण्या जयसिंह सोळंके यांच्या नावाची घोषणा केली आहे. सध्या प्रकाश सोळंके हे 2024 च्या आमदारकीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने माजलगाव विधानसभा मतदारसंघातील विविध गावांचे दौरे करत आहेत. त्याचवेळी एका गावात बोलताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत माजलगाव विधानसभा मतदारसंघातून जयसिंह सोळंके निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. 

आमदार प्रकाश सोळंकेंनी राजकीय वारसदार म्हणून घोषणा केलेले जयसिंह सोळंके कोण?

माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचे लहान बंधू धैर्यशील सोळंके यांचे जयसिंह सोळंके हे चिरंजीव आहेत. म्हणजेच प्रकाश सोळंके यांचे पुतणे. जयसिंह सोळंके धारूर पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले आहेत. त्यासोबतच बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष म्हणून जयसिंह सोळंके यांनी यापूर्वी काम पाहिलं होतं. आता जयसिंह सोळंके हेच प्रकाश सोळंके यांचे वारसदार म्हणून आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा :

जागावाटपावर MVA बैठक कधी करणार? काँग्रेसने तारीख केली उघड

Who is Sita Shelke: कोण आहेत सीता शेळके?, का आल्यात चर्चेत? जाणून घ्या

उजनी धरण ओवरफ्लो, 40 हजार क्युसेकचा विसर्ग; पंढरपूरसह काही गावांना पुराचा धोका

नाशिकमध्ये बस-कारच्या धडकेने झालेल्या आगीत 2 जणांचा होरपळून मृत्यू

 

 

Share this article