Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर हप्ता खात्यात जमा, महिलांना दिवाळीपूर्वी दिलासा; E-KYC नसेल तर?

Published : Oct 11, 2025, 10:00 AM IST
Ladki Bahin Yojana

सार

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला असून, सरकारने दिवाळीपूर्वी दिलासा दिला आहे. ई-केवायसी बंधनकारक असून अधिकृत वेबसाइटवरच प्रक्रिया करावी. 

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे हा हप्ता वेळेत मिळेल का, याबाबत शंका होती; मात्र सामाजिक न्याय विभागाने ४१० कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केल्यानंतर हा हप्ता शुक्रवारी (११ ऑक्टोबर) पासून जमा होऊ लागला आहे. राज्य सरकारकडून महिलांना दिवाळीपूर्वी दिलेली ही आर्थिक भेट ठरली आहे.

१ कोटी महिलांनी केली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी दोन महिन्यांच्या आत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. आतापर्यंत सुमारे १ कोटी महिलांनी ही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. केवायसी पूर्ण न केलेल्या महिलांनाही यावेळी सप्टेंबरचा हप्ता जमा झाला असून, सरकारकडून सर्वांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.

 ई-केवायसी बंधनकारक; फेक वेबसाईटपासून सावध राहा

लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी केवायसीसाठी केवळ अधिकृत संकेतस्थळ [https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc](https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc) यावरच प्रक्रिया करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, **[https://hubcomuat.in/](https://hubcomuat.in/)** यांसारख्या फेक वेबसाईट्स गुगलवर दिसत असून, त्यावर माहिती भरल्यास वैयक्तिक डेटा चोरी जाण्याचा धोका असल्याची सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

केवायसी करताना अडचणी; वेबसाइट ठप्प 

ई-केवायसी करताना अनेक लाभार्थ्यांना तांत्रिक अडचणी येत आहेत. अधिकृत वेबसाईट काही वेळा ठप्प होत असून, ओटीपी न मिळणे ही मोठी समस्या बनली आहे. शिवाय, केवायसी करताना पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक देणे बंधनकारक असल्याने, पती हयात नसलेले किंवा पालक उपलब्ध नसलेले लाभार्थी संभ्रमात आहेत. सरकारकडून या समस्यांवर उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया

1. [https://ladakibahin.maharashtra.gov.in](https://ladakibahin.maharashtra.gov.in) या संकेतस्थळाला भेट द्या.

2. मुखपृष्ठावरील e-KYC बॅनरवर क्लिक करा.

3. आपला आधार क्रमांक आणि Captcha Code भरून Send OTP वर क्लिक करा.

4. आलेला OTP टाकून Submit करा.

5. प्रणाली तपासेल की ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे की नाही.

6. न झाल्यास, पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नमूद करून OTP प्रक्रिया पूर्ण करा.

7. त्यानंतर जात प्रवर्ग निवडा आणि कुटुंबासंबंधी घोषणांवर (Declaration) टिक करून Submit करा.

8. शेवटी “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Indigo Update : आजही शुक्रवारी शेकडो उड्डाणे रद्द, मुंबई-पुणे-नागपूरसह प्रमुख विमानतळांवर गोंधळ
माझो वरली महागडी गं, रिअल इस्टेटमध्ये न्यूयॉर्कच्या लोअर मॅनहॅटनशी होतेय तुलना, अपार्टमेंटची किंमत 1 लाख रुपये प्रति चौरस फूट