
Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला भरघोस मतं मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर मोहीम राबवली जात आहे. या योजनेमुळे तिजोरीवर प्रचंड आर्थिक भार पडल्याने सरकारने कठोर अटींची अंमलबजावणी सुरू केली आहे.
लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांच्या पती किंवा वडिलांची e-KYC अनिवार्य करण्यात आली आहे. जर महिलेचे लग्न झाले असेल तर पतीचे आणि नसेल तर वडिलांचे वार्षिक उत्पन्न तपासले जाईल. महिला आणि तिच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास लाभ नाकारला जाईल.
याआधी फक्त महिलांचे उत्पन्न तपासण्यात आले होते. मात्र, बहुतेक गृहिणींचे उत्पन्न अडीच लाखांखाली असल्याने अनेक पात्र ठरल्या. त्यामुळे आता कुटुंबाचे एकूण उत्पन्न शोधण्यासाठी सरकारने नवे पाऊल उचलले आहे. यामुळे अनेक महिलांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे.
लाभार्थींनी [ladakibahin.maharashtra.gov.in](https://ladakibahin.maharashtra.gov.in) या संकेतस्थळाला भेट देऊन e-KYC पूर्ण करायची आहे.
लाभार्थ्याने जाहीर करावे की –
1. कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारक नाही.
2. कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला लाभ घेत आहे.