Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! ई-केवायसीसाठी मिळाली मोठी मुदतवाढ; पाहा काय आहे नवी डेडलाईन

Published : Apr 02, 2026, 06:47 PM IST

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली. तांत्रिक कारणांमुळे लाभ थांबलेल्या महिलांसाठी ही संधी असून अर्ज दुरुस्त करून योजनेचा लाभ पुन्हा सुरू करता येणारय. 

PREV
15
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! ई-केवायसीसाठी मिळाली मोठी मुदतवाढ

मुंबई: राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय असलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ज्या महिलांना तांत्रिक कारणांमुळे किंवा ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेतील त्रुटींमुळे योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत होत्या, त्यांच्यासाठी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ई-केवायसी दुरुस्तीसाठी आता ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 

25
आदिती तटकरे यांनी दिली माहिती

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी 'X' (ट्विटर) वर पोस्ट शेअर करत सांगितले की, “राज्यात आलेले अवकाळी पावसाचे संकट, गारपिटीचा इशारा आणि लाडक्या बहिणींनी केलेली मागणी लक्षात घेता, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे.” 

35
का महत्त्वाची आहे ही मुदतवाढ?

अनेक महिलांनी ३१ मार्चपर्यंत आपली केवायसी दुरुस्ती पूर्ण केली नव्हती. तांत्रिक बिघाड किंवा माहिती भरताना झालेल्या चुकांमुळे हजारो महिलांचे हप्ते थांबले होते. आता ३० एप्रिलपर्यंत वेळ मिळाल्याने या महिलांना आपल्या अर्जातील त्रुटी दूर करून पुन्हा योजनेचा लाभ सुरू करता येणार आहे. 

45
ई-केवायसी अनिवार्य का?

सरकारने ही योजना अधिक पारदर्शक करण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक केली आहे.

बोगस लाभार्थ्यांना चाप: पात्र महिलांनाच लाभ मिळावा आणि चुकीच्या पद्धतीने पैसे घेणाऱ्यांना रोखता यावे, हा सरकारचा उद्देश आहे.

त्रुटींचे निराकरण: सप्टेंबर २०२५ पासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत ज्या महिलांनी चुकीचे पर्याय निवडले होते, त्यांना आता ही शेवटची संधी मिळणार आहे. 

55
मंत्र्यांचे आवाहन, 'ही शेवटची संधी'

मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, ही अंतिम मुदतवाढ असू शकते. त्यामुळे ज्या महिलांची ई-केवायसी दुरुस्ती अद्याप प्रलंबित आहे, त्यांनी ३० एप्रिल २०२६ पूर्वी ती पूर्ण करून घ्यावी. केवायसी पूर्ण न झाल्यास संबंधित महिलांना योजनेच्या लाभापासून मुकावे लागू शकते.

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories