Vidhan Parishad Election 2026 : कोकण विधान परिषद निवडणूक बिनविरोध; अनिकेत तटकरे यांचा विजय, पाच ठिकाणी महायुतीचे वर्चस्व

Published : Jun 05, 2026, 01:14 PM IST
Vidhan Parishad Election 2026

सार

Vidhan Parishad Election 2026 : कोकण विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाली असून अनिकेत तटकरे विजयी झाले आहेत. बाळ माने यांनी अर्ज मागे घेतल्याने महायुतीला मोठे यश मिळाले आहे. पाचही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

Vidhan Parishad Election 2026 : कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांचा या निवडणुकीत कोणताही विरोधी उमेदवार न राहिल्याने त्यांचा थेट विजय झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध ठरली असून कोकणातील राजकीय समीकरणात मोठा बदल पाहायला मिळाला आहे.

बाळ माने यांचा माघार निर्णयामुळे निवडणूक बिनविरोध

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सुरुवातीला चुरशीची लढत अपेक्षित होती. मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला.

अनिकेत तटकरेंची भावूक पोस्ट चर्चेत

 विजयानंतर अनिकेत तटकरे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली. “तारखांचा योगायोग आणि नियतीचा खेळ” असे म्हणत त्यांनी 2018 पासून 2026 पर्यंतच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख केला. जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे हा विजय शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

पाच मतदारसंघात महायुतीचे वर्चस्व

 या निवडणुकीत पाच मतदारसंघांमध्ये निवडणूक बिनविरोध झाली असून महायुतीच्या उमेदवारांनी थेट विजय मिळवला आहे. यात वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर, पुणे, ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि यवतमाळ या मतदारसंघांचा समावेश आहे.

राजकीय चित्र स्पष्ट

काही ठिकाणी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे तर काही ठिकाणी सहमती झाल्यामुळे महायुतीला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक