लाडकी बहीण योजनेचा हप्ता २६ जानेवारीच्या आत दिला जाणार : मंत्री आदिती तटकरे

लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता २६ जानेवारीच्या आत दिला जाईल. डिसेंबर महिन्याचा हप्ता २५ ते ३० डिसेंबर दरम्यान वितरित करण्यात आला होता. अर्थ विभागाकडून ३६९० कोटी रुपयांचा निधी जानेवारी महिन्यासाठी मिळाला आहे.

मुंबई: लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मकर संक्रांतीला मिळण्याची शक्यता होती. परंतु, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून हप्त्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत नवी माहिती दिली आहे. त्यांनी नवीन वर्षाचा पहिला जानेवारी महिन्याचा डीबीटी लाभ द्यायला सुरुवात 26 जानेवारीच्या अगोदरपासून सुरु करणार आहोत, अशी माहिती दिली आहे.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हफ्ता २५ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालवधीत वितरीत केला होता. नवीन वर्षातील जानेवारी महिन्याचा लाभ वाटपाची सुरुवात २६ जानेवारीच्या आत सुरुवात करणार आहोत. त्यासंदर्भातील आर्थिक नियोजन आम्हाला अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाला प्राप्त झाल आहे. त्यामुळे लाडक्या बहिनींचा जानेवारीचा लाभ २६ जानेवारीच्या आत वितरणाला सुरुवात होईल. तीन ते चार दिवसात लाडक्या बहिणींना तो प्राप्त होईल.

आणखी वाचा- Credit Card Guide:: फायदे, अर्ज कसा करावा, योग्य कार्ड निवड

जानेवारी महिन्याच्या लाभाच्या वितरणाची सुरुवात 26 जानेवारीच्या आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार करणार आहोत. 2100 रुपयांबाबत नव्या अर्थसंकल्पात किंवा त्यानंतरच्या काळात विचार केला जाईल. सध्या १५०० रुपयांचा हफ्ता लाडक्या बहि‍णींच्या खात्यात जमा होईल, असं आदिती तटकरे म्हणाल्या.

मंत्री तटकरे पुढे म्हणाल्या, घोषणापत्रकामध्ये आम्ही जे वचन दिल आहे त्याप्रमाणे लाडक्या बहिनींना लाभ दिला जाईल. जास्तीत जास्त महिलांपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पोहोचवणं आमचा प्रयत्न आहे. अर्थ विभागाकडून 3690 कोटी रुपयांचा निधी जानेवारी महिन्याच्या वितरणासाठी मिळालेला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या वितरणाची तयारी देखील सुरू आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरही पुढील महिन्यात लाभ वितरणात खंड पडणार नाही याची उपाय योजना आम्ही करणार आहोत. डिसेंबर महिन्यात 2 कोटी 47 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला आहे. लाभार्थ्यांच्या संख्येत फार काही फरक पडणार नाही, असेही मंत्री तटकरे म्हणाल्या.

आणखी वाचा- NEET UG 2025: मोठे बदल जाहीर, पेन-पेपर मोडमध्ये परीक्षा

दुबार नाव नोंदणी, दुसऱ्या योजनांसह या योजनेचा लाभ घेतलेला आहे, तसे असतील किंवा काही महिलांचं उत्पन्न वाढलंय असं लक्षात आल्यानंतर ज्यांनी नावं काढून घेतली अशी नावं कमी होतील. या महिन्यात लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांचा आकडा कायम राहील, त्यात थोडाफार बदल झाला तर एक लाखानं संख्या कमी होईल, असं आदिती तटकरेंनी म्हटलं.

Share this article