२१ जुलैला धो धो पाऊस पडणार, पावसानं नदी नाले वाहायला लागणार

Published : Jul 15, 2026, 10:24 PM ISTUpdated : Jul 16, 2026, 12:00 AM IST
Maharashtra monsoon 2020

सार

महाराष्ट्रात कमी पावसामुळे चिंतेचे वातावरण असताना, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे १६-१७ जुलै दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतकऱ्यांना या अंदाजानुसार शेतीची कामे करण्याची सूचना देण्यात आली आहे.

महाराष्ट्र: पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं सध्या महाराष्ट्रात चिंतेचं वातावरण तयार झालं आहे. बंगालच्या खाडीत, ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या सागरी किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यात पुन्हा भारतात आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हवामानाचा अंदाज केला व्यक्त 

भारतीय हवामान विभागाने हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार पूर्व आणि पूर्वेतर भारतात, पूर्व उत्तर प्रदेशात, हिमालय क्षेत्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता १६ ते १७ जुलैच्या दरम्यान कोकण आणि गोव्यात चांगला पाऊस होऊ शकतो.

कोणत्या भागात होणार पाऊस? 

याच काळात गुजरात, मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागातही पाऊस होणार आहे. त्यामुळं पावसाचा हा अंदाज लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी आपली काम करावीत असं सांगण्यात आलं आहे. शेतातील काम करताना आपण काळजी घ्यावी असं सांगण्यात आलं आहे. २१ जुलैला मध्य महाराष्ट्र पुन्हा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धरण भरताना पाऊसाची महत्वाची भूमिका ठरणार आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Drought : महाराष्ट्रात भीषण दुष्काळ; मदतीसाठी सरकारची तयारी सुरू
Old Monk FSSAI Dispute : 'ओल्ड मंक'ला आता 'रम' म्हणता येणार नाही? FSSAI च्या अटीमुळे कंपनीला 500 कोटींचा फटका