IMD चा इशारा! महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय; कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढणार

Published : Jul 17, 2026, 08:39 AM IST
mumbai rain alert imd green alert thane palghar weather forecast high tide july 2026

सार

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. याशिवाय कोकण, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील स्थिती कशी असणार याबद्दलही IMD ने अंदाज जारी केला आहे.  

मुंबई :  राज्यात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आयएमडीने (IMD) व्यक्त केली आहे. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

कोकण आणि मुंबईत हलका ते मध्यम पाऊस

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात यलो अलर्ट

पुणे, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच काही भागांत जोरदार वारे वाहू शकतात. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. दरम्यान, सातारा, सोलापूर, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.

 विदर्भात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा

विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यासोबतच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका सुरूच, अकोल्यात ५० लाखांचं साहित्य जप्त
Siya Goyal : माझ्या कुटुंबाविरोधात कट, आम्ही त्रासात; माझी मुलगी दोषी असेल तर तिला फाशी द्या, पण...