शेजाऱ्याने तुमच्या जमिनीचा भाग कब्जात घेतलाय?, अशा वेळी जमीन परत मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या!

Published : Nov 15, 2025, 07:22 PM IST

How To Settle Property Line Disputes: शेजाऱ्याने जमिनीवर अतिक्रमण केल्यास कायदेशीर प्रक्रिया काय आहे, हे या लेखात सांगितले आहे. तलाठ्याकडे तक्रार करण्यापासून ते अधिकृत मोजणी, तहसीलदाराचा आदेश आणि न्यायालयाचा मार्ग यांसारख्या टप्प्यांची माहिती दिली.

PREV
16
शेजाऱ्याने तुमच्या जमिनीचा भाग कब्जात घेतलाय?

राज्यात जमीन ताबा, सीमारेषा व मोजणीसंबंधी वाद मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही, जुन्या मोजणीतील चुका, पिकांची फेरबदल, सीमारेषेवरील खूणदर्शक नष्ट होणे किंवा जाणूनबुजून केलेले अतिक्रमण यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा काही भाग शेजाऱ्याकडे गेल्याचे उशिरा लक्षात येते. अशा वेळी नेमकी कोणती पावले उचलायची? आणि हक्काची जमीन पुन्हा कशी मिळवायची? चला, पूर्ण प्रक्रिया समजून घेऊया. 

26
१) तक्रार नोंदवा, प्रक्रियेची सुरुवात इथूनच

तुमच्या जमिनीचा काही तुकडा शेजारी ताब्यात घेतल्याचा संशय आला की सर्वप्रथम स्थानिक तलाठी कार्यालयात लेखी तक्रार दाखल करा.

तक्रारीत नमूद करा.

सर्वे/गट नंबर

मूळ सीमारेषा

किती जमीन ताब्यात गेली असल्याचा अंदाज

दोन्ही शेतांच्या सीमा व तपशील

तक्रार मिळाल्यानंतर तलाठी प्राथमिक पाहणी करून दोन्ही पक्षांना जागेवर बोलावतो.

36
२) अधिकृत मोजणी, वाद सोडवण्याचा सर्वात महत्त्वाचा टप्पा

जमिनीचा वाद स्पष्ट करण्यासाठी अधिकृत मोजणी अत्यंत आवश्यक असते.

तलाठीच्या पाहणीनंतर दोन्ही बाजूंनी सहमती मिळाल्यास शेतकऱ्याने तहसील कार्यालयात मोजणीसाठी अर्ज करावा.

मोजणी अधिकारी DGPS किंवा ETS सारख्या आधुनिक उपकरणांच्या मदतीने:

सीमारेषा अचूक ठरवतो

किती जमीन कोणाकडे गेली आहे हे अहवालात स्पष्ट करतो

हा अहवालच पुढील निर्णयाचा आधार ठरतो.

46
३) तहसीलदाराचा आदेश, हक्काची जमीन परत मिळवण्यासाठी निर्णय

जर मोजणी अहवालात तुमचा ताब्याचा भाग शेजाऱ्याकडे गेल्याचे निश्चित झाले, तर शेतकरी तहसीलदारांकडे जमीन ताब्यात देण्याच्या आदेशासाठी अर्ज करू शकतो.

तहसीलदार

दोन्ही पक्षांची सुनावणी करतात

मोजणी अहवालाची पडताळणी करतात

आणि चुकीने ताब्यात गेलेली जमीन परत देण्याचा आदेश देऊ शकतात

56
४) आदेशाची अंमलबजावणी, प्रत्यक्ष जमीन परत मिळते इथे

तहसीलदाराचा आदेश मिळाल्यानंतर मंडळाधिकारी, तलाठी व आवश्यकता असेल तर पोलीस यांच्या उपस्थितीत जमीन प्रत्यक्ष मालकाला परत दिली जाते.

यावेळी

नवीन सीमारेषा निश्चित केली जाते

खूणदर्शक/खांब लावले जातात

ताबा अधिकृतपणे हस्तांतरीत केला जातो

जर शेजारी आदेशाचे पालन करण्यास नकार देत असेल तर कायद्यानुसार सक्तीची अंमलबजावणी केली जाऊ शकते.

66
५) न्यायालयाचा मार्ग, अंतिम व कायदेशीर उपाय

तहसील कार्यालयाचा निर्णय अपुरा वाटल्यास किंवा प्रकरण क्लिष्ट असल्यास, शेतकरी नागरी न्यायालयात अतिक्रमण विरोधातील दावा (Encroachment Suit) दाखल करू शकतो.

न्यायालय

मोजणी अहवाल

जमीन कागदपत्रे

मालकीची नोंद

यांच्या आधारे अंतिम आदेश देते आणि जमीन परत मिळवून देते.

तुमच्या जमिनीचा तुकडा शेजाऱ्याकडे गेला असला, तरी योग्य प्रक्रियेने हक्काची जमीन परत मिळवणे शक्य आहे. वेळीच तक्रार, अचूक मोजणी आणि प्रशासन/न्यायालय यांचा योग्य पाठपुरावा केल्यास समस्या नक्की सुटू शकते.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories