
Maharashtra: भारतीय हवामान विभागाने १५ जुलै रोजीचा हवामान अंदाज जारी केला आहे. या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे. कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने या भागात येलो अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी चक्री वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. नदीच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे नदी कडेला राहणाऱ्या गावकऱ्यांनी काळजी घेण्याचं अवाहन करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिकमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसामुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असं अवाहन करण्यात आलं आहे.
औरंगाबाद, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह होण्याची शक्यता आहे.ढगाळ वातावरण राहिल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, वादळी वाऱ्यांपासून फळबागा आणि पीकांचे संरक्षण करावे, असे हवामान विभागाचे सांगणे आहे. विजा चमकत असणारा बाहेर न पाडण्याचे अवाहन करण्यात आलं आहे.
विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. नागपूर आणि गोंदियामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. चंद्रपूर व अमरावतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.