पुण्यात सध्या एक दुर्मिळ आजार गुइलेन बॅरे सिंड्रोमने हाहाकार माजवला आहे. या आजारामध्ये व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे शरिरातील स्नायूंवर याचा परिणाम झाल्याचे दिसते. गंभीर स्थितीत लकवाही मारला जाऊ शकतो
Guillain-Barre Syndrome in Pune : पुण्यात सध्या एक दुर्मिळ आजार गुइलेन बॅरे सिंड्रोमने हाहाकार माजवला आहे. या आजारामध्ये व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे शरिरातील स्नायूंवर याचा परिणाम झाल्याचे दिसते. गंभीर स्थितीत लकवाही मारला जाऊ शकतो.
पुण्यात गुलइनेल बॅरे सिंड्रोम नावाचा एक दुर्मिळ आजार झपाट्याने नागरिकांना होत असल्याची दिवसागणिक प्रकरणे वाढत चालली आहेत. आतापर्यंत जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आकडा 73 वर पोहोचला आहे. या आजाराच्या विरोधात लढण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून तपासासाठी एक टीम तयार केली आहे.
गुइलेन बॅरे सिंड्रोमची लागण झाल्यास व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. परिणामी व्यक्तीच्या स्नायूंवर प्रभावर होत त्याला थकवा जाणवतो. काही प्रकरणात हात पाय सुन्न पडणे, चालण्याफिरण्यास त्रास होतो. एवढेच नव्हे काही स्थितीत लकवाही मारला जाऊ शकतो.
पुणे जिल्हा प्रशासनाने जीबीएसबद्दल म्हटले आहे की, नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. पण सावधगिरी बाळण्याची गरज आहे. जीबीएसचा वाढता प्रकोप पाहता पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचडवड महापालिकेने शहरात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षिततेसंदर्भात उपाय अधिक वाढवण्यात आले आहेत. आरोग्य विभागाच्या टीमकडून जीबीएसची लक्षणे आणि कारणे शोधत आहेत.
पुणे विभागाचे आयुक्त चंद्रकांत पुंडकुलवार म्हणाले की, गुरुवारपर्यंत रुग्णांचा आकडा 67 वर पोहोचला होता. आता रुग्ण 73 वर येऊन पोहोचले आहेत. यामध्ये पुरुष आणि महिलांचा देखील समावेश आहे. याआधी एकाच दिवसात 8 रुग्णांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. हे रुग्ण पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील ग्रामीण परिसरातील आहेत. याशिवाय आतापर्यंत जीबीएसचे 13 रुग्ण व्हेंटिलेटवर असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. जीबीएसच्या रुग्णांची नमूने परिक्षणासाठी राष्ट्रीय विज्ञान संस्था (NIV) पुणे येथे पाठवण्यात आले आहेत.
आणखी वाचा :
थंडीत स्नायूदुखीपासून आराम मिळवण्याचे सोपे उपाय जाणून घ्या
हिवाळ्यात रोज किती अंडी खावी?, जाणून घ्या अंडी खाण्याचे 5 फायदे