मोठी बातमी! शेतकरी कुटुंबाला मिळतील 'एवढे' लाख रुपये, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती!

Published : Dec 10, 2025, 11:00 PM IST

Gopinath Munde Farmer Accident Scheme : राज्य शासनाने 'गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना' प्रभावी केली. यानुसार विमा कंपन्यांशिवाय थेट सरकारकडून शेतकऱ्यांच्या कुटुंबाला अपघाती मृत्यू, अपंगत्वासाठी २ लाखांपर्यंतचे अनुदान मिळणारय

PREV
16
गोपीनाथ मुंडे अपघात योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

Agriculture News : शेती ही शेतकऱ्यांसाठी उपजीविकेचे साधनच नव्हे, तर लढाई आहे. पाऊस, उन्हाळा, रात्र-पहाट काहीही असो शेतकरी कामातच गुंतलेला असतो. पण या मेहनतीसोबत अपघातांची शक्यता देखील नेहमीच कायम असते. सर्पदंश, विजेचा धक्का, पाण्यात बुडणे, रस्ते अपघात, विषबाधा या कारणांमुळे दरवर्षी अनेक शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा फटका बसतो. याच संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाकडून ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ अधिक प्रभावीपणे राबवली जात आहे. 

26
योजनेतील सर्वात मोठा बदल, प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल!

यापूर्वी ही योजना विमा कंपन्यांमार्फत चालत होती. पण दावा मंजुरीत विलंब, कागदी प्रक्रिया आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक कुटुंबांना लाभच मिळत नव्हता.

शासनाने हे लक्षात घेऊन

विमा कंपन्यांचा मध्यस्थपणा हटवला

अनुदान थेट सरकारकडून देण्यात येईल

मदत मिळण्याची प्रक्रिया वेगवान आणि पारदर्शक

अशी सुधारणा केली आहे. 

36
ऑनलाईन अर्ज कुठे आणि कसा करायचा?

शेतकरी किंवा कुटुंबीय महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज करू शकतात.

mahadbt.maharashtra.gov.in

ऑनलाईन अर्जाची सुविधा

ज्यांना ऑनलाईन अडचण आहे त्यांच्यासाठी ऑफलाईन अर्जाचीही व्यवस्था

योजना कृषी विभागामार्फत राबवली जाते 

46
या योजनेत किती मदत मिळते?

अपघाताच्या प्रकारानुसार आर्थिक मदत दिली जाते.

अपघाताचा प्रकार आर्थिक सहाय्य

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू ₹2,00,000

दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात/पाय कायमचे निकामी ₹2,00,000

एक डोळा किंवा एक अवयव निकामी ₹1,00,000

संपूर्ण रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. 

56
पात्रता – कोण अर्ज करू शकतो?

लाभ घेणारा शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असावा

7/12 उताऱ्यावर नाव वहितीधारक म्हणून नोंदलेले असावे

वयोमर्यादा : 10 ते 75 वर्षे

शेतकऱ्यासोबत कुटुंबातील एका सदस्यालाही कव्हर मिळू शकते (एकूण दोन व्यक्ती) 

66
कोणत्या अपघातांना अनुदान मिळते?

शासनाच्या नियमानुसार खालील अपघात आणि घटनांमध्ये अनुदान लागू आहे.

रस्ता किंवा रेल्वे अपघात

पाण्यात बुडणे

विजेचा धक्का

सर्पदंश / विंचूदंश

जनावरांचा हल्ला

उंचावरून पडणे

जंतुनाशकांमुळे विषबाधा

दंगल किंवा खून

नक्षलवादी हल्ल्यातील मृत्यू / दुखापत

ही योजना शेतकऱ्यांसाठी खरंच मोठा आधार आहे. संकटाच्या काळात त्वरित मदत मिळावी आणि कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये, हा सरकारचा उद्देश आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories