नाताळ–नववर्षाचा धमाका! मुंबई–पुण्यातून विदर्भासाठी मध्य रेल्वेकडून 3 खास गाड्या, वेळापत्रक जाहीर

Published : Dec 10, 2025, 04:52 PM IST

ख्रिसमस, नववर्ष, हिवाळी सुट्ट्यांदरम्यान वाढणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई, पुण्यातून अमरावती,  नागपूरसाठी ७६ विशेष हिवाळी सेवा जाहीर केल्यात. या विशेष गाड्या २० डिसेंबर २०२५ ते ३ जानेवारी २०२६ दरम्यान धावणारय. 

PREV
15
मुंबई–पुण्यातून विदर्भासाठी मध्य रेल्वेकडून 3 खास गाड्या

Central Railway Special Trains : ख्रिसमस, नववर्ष आणि हिवाळी सुट्यांदरम्यान वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांना धडाकेबाज भेट दिली आहे. मुंबई आणि पुण्यातून अमरावती व नागपूरला जाणाऱ्या तीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून, एकूण 76 हिवाळी विशेष सेवांना मान्यता देण्यात आली आहे. या गाड्यांचे तिकीट आरक्षण 10 डिसेंबरपासून सर्व ठिकाणी खुले होणार आहे. 

25
मुंबई–नागपूर–मुंबई विशेष, एकूण 6 फेऱ्या

गाडी क्रमांक 01005 – CSMT ते नागपूर

चालू कालावधी: 20 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026

सुटण्याची वेळ: शनिवार, दुपारी 12.30

गाडी क्रमांक 01006 – नागपूर ते CSMT

त्याच कालावधीत 6 विशेष फेऱ्या

थांबे: दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, वर्धा 

35
पुणे–नागपूर विशेष : 6 सेवा

गाडी क्रमांक 01401 – पुणे ते नागपूर

19 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026

गाडी क्रमांक 01402 – नागपूर ते पुणे

20 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026

थांबे: दौंड कॉर्ड लाइनमार्गे अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, वर्धा 

45
अमरावती–पुणे–अमरावती विशेष : 6 सेवा

गाडी क्रमांक 01404

अमरावती–पुणे : दर रविवारी 12.00 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी 12.15 ला पुण्यात आगमन

गाडी क्रमांक 01403

पुणे–अमरावती : 20 डिसेंबर ते 3 जानेवारीपर्यंत दर शनिवारी

मार्ग: दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव 

55
विदर्भातील प्रवाशांसाठी दिलासा

हिवाळ्यातील पर्यटन, नाताळ–नववर्षाच्या सुट्या आणि सणासुदीमुळे वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेऊन या अतिरिक्त सेवांना परवानगी देण्यात आली आहे. विशेषतः विदर्भ–मुंबई–पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना या गाड्या मोठी सुविधा देणार आहेत.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories