
पुणे : गणेशोत्सवाचा उत्साह राज्यात सर्वत्र पाहायला मिळत असतानाच पुण्यातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. खेड तालुक्यातील वाकी बुद्रूक येथे गणपती विसर्जनावेळी दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेने आनंदमय वातावरणाला गालबोट लागले असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करत गणरायाला निरोप देत असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.