Ganpati Special Trains : चाकरमान्यांसाठी मोठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक जाहीर

Published : Aug 06, 2026, 10:25 AM IST
Indian Railways

सार

गणेशोत्सवानिमित्त पश्चिम रेल्वेने मुंबई, गुजरात आणि कर्नाटकला कोकणाशी जोडणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली आहे.

मुंबई :  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. मुंबई, गुजरात आणि कर्नाटकला कोकणाशी जोडणाऱ्या या विशेष रेल्वेगाड्या 'ट्रेन ऑन डिमांड' (TOD) योजनेअंतर्गत चालविण्यात येणार आहेत. रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक (CPTM) यांनी 5 ऑगस्ट 2026 रोजी या गाड्यांची घोषणा केली आहे.

गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या

गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने अतिरिक्त रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या 'ट्रेन ऑन डिमांड' (TOD) श्रेणीत चालविल्या जाणार आहे. या गाड्यांचे आरक्षण विशेष दरात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

मुंबई सेंट्रल-ठोकूर साप्ताहिक विशेष गाडी

गाडी क्रमांक 09013 दर मंगळवारी सकाळी 10.45 वाजता मुंबई सेंट्रलहून सुटून बुधवारी सकाळी 8.50 वाजता ठोकूर येथे पोहोचेल.

परतीची गाडी क्रमांक 09014 बुधवारी सकाळी 11 वाजता ठोकूरहून सुटून गुरुवारी सकाळी 7.40 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल.

मुंबई सेंट्रल-सावंतवाडी रोड विशेष सेवा

गाडी क्रमांक 09019 दर बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मुंबई सेंट्रलहून सकाळी 10.45 वाजता सुटेल.

परतीची गाडी क्रमांक 09020 गुरुवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी सावंतवाडी रोडहून मुंबईकडे धावेल.

बांद्रा टर्मिनस-रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडी

गाडी क्रमांक 09035 दर गुरुवारी दुपारी 2.20 वाजता बांद्रा टर्मिनसहून रत्नागिरीकडे रवाना होईल.

गाडी क्रमांक 09036 शुक्रवारी पहाटे 1.30 वाजता रत्नागिरीहून मुंबईकडे परतीचा प्रवास करेल.

गुजरात-कोकणसाठीही विशेष रेल्वे सेवा

गणेशोत्सवानिमित्त गुजरातमधील वडोदरा, विश्वामित्री, उधना आणि वलसाड येथून रत्नागिरीसाठी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे गुजरातमधील चाकरमान्यांना थेट कोकणात जाण्याची सुविधा मिळणार आहे.

'या' प्रमुख स्थानकांवर थांबा

या विशेष गाड्यांना बोरीवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कुडाळ आणि थिवीम या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था

मुंबई सेंट्रल आणि बांद्रा टर्मिनसहून सुटणाऱ्या गाड्यांना डबल-एंडेड इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे वसई रोड येथे इंजिन बदलण्याची गरज भासणार नाही आणि गाड्यांचा वेळ वाचणार आहे.

तसेच सर्व स्थानक व्यवस्थापकांना विशेष गाड्यांचे वेळापत्रक सूचना बोर्डवर जारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रवाशांना ICMS (Integrated Coaching Management System) आणि NTES (National Train Enquiry System) द्वारे वेळापत्रक आणि आरक्षणाची माहिती मिळू शकते.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Pune Crime : निगडीत मंदिरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मेट्रो कामगार अटकेत
Tukaram Mundhe : शाळेत वडापाव पुन्हा सुरू करा! चिमुकल्याच्या प्रश्नावर तुकाराम मुंढेंनी दिलं भन्नाट उत्तर