Four Year Old Girl Died : विरारमध्ये 19 मजली इमारतीतून खाली पडून चार वर्षांच्या चिमुकलीचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Four Year Old Girl Died In Virar : तुम्हाला देखील आपल्या लहान मुलांना घरात एकटेच ठेवून कामानिमित्त घराबाहेर जाण्याची सवय आहे का? वेळीच सावध व्हा, अन्यथा तुमची ही सवय तुमच्या मुलांच्या जीवावर बेतू शकते. पालघर जिल्ह्यातील विरार येथे अशीच काहीशी धक्कादायक घडली आहे.
Mid Dayया वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, घरात एकट्याच असणाऱ्या चार वर्षांच्या चिमुकलीचा इमारतीच्या चौथ्या मजल्याहून खाली पडून मृत्यू झाला आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना मंगळवारी (10 ऑक्टोबर 2023) सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी घडली. दर्शनी शालियान (Palghar Virar Darshani Shalian Died) असे मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद (Virar Police have registered an accidental death report) करून पुढील तपास सुरू केला आहे.
नेमके काय घडले?
विरार पश्चिमेकडील व्हाय.के. नगर (YK Nagar) परिसरातील ‘बछराज लाइफस्पेस टॉवर’ (Bachraj Lifespace tower at YK Nagar) या 19 मजली इमारतीमध्ये ही दुर्घटना घडली आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर शालियान कुटुंब राहत होते.
ज्यावेळेस ही घटना घडली तेव्हा दर्शनीच्या आईने तिला घरात एकटेच ठेवलं आणि दुचाकीवरून पती सुरेश शालियान यांना विरार रेल्वे स्टेशनपर्यंत सोडण्यास गेली. दाम्पत्याच्या म्हणण्यानुसार त्यांना दर्शनीची झोप मोड करायची नव्हती, म्हणून लेकीला झोपलेल्याच अवस्थेत एकटे ठेवून पती-पत्नी घराबाहेर पडले.
घरात आई-बाब नव्हतेच, अन् मग…
पण मुलीला जाग येताच ती आपल्या आई-बाबांचा घरामध्ये सर्वत्र शोध घेऊ लागली. आई-बाबा घरात कुठेच न दिसल्याने अखेर तिनं रूममधील बेडवर उभे राहून खिडकीतून खाली वाकून आई-बाबा कुठे दिसतायेत का? हे पाहण्याचा प्रयत्न केला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पण दुर्दैव म्हणजे खिडकीतून खाली पाहताना तोल जाऊन दर्शनी खाली पडली व जागेवरच तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूमुळे शालियान दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पण अशा परिस्थितीतही तिच्या आई-वडिलांनी धाडसी निर्णय घेऊन लेकीचे डोळे दान केले आहेत.
आणखी वाचा :
Mumbai School Boy Death : पीटी क्लासमध्ये 13 वर्षीय विद्यार्थ्याचा कोसळून मृत्यू, पोलीस करताहेत तपास
बॉलिवूडचा किंग SHAHRUKH KHANच्या जीवाला धोका, धमक्यांनंतर मिळालं Y PLUS सुरक्षाकवच
मृत्यूचं तांडव! नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 48 तासांत 31 रुग्णांचा मृत्यू, धक्कादायक कारण समोर