तुमचा बाप हिंदुस्तानात बसलाय -नवनीत राणा, पलवाशा यांच्या भडक वक्तव्याचा घेतला समाचार

Published : May 02, 2025, 11:24 AM IST
नवनीत राणा

सार

पाकिस्तानी सिनेटर पलवाशा महंमद झई खान यांनी बाबरीची वीट पुन्हा ठेवण्याची भाषा केली केली. त्यावर अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी तुमचा बाप हिंदुस्तानात बसला आहे, असे म्हटले आहे.

अमरावती - पाकिस्तानी सिनेटर पलवाशा महंमद झई खान यांनी बाबरीची वीट पुन्हा ठेवण्याची भाषा केली केली. त्यावर भारतात प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी तुमचा बाप हिंदुस्तानात बसला आहे, असे म्हटले आहे.

अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा म्हणाल्या, की सध्या फक्त पाणी बंद केलं. आता दानाही बंद करणार आहे. ८० टक्के पाणी आम्ही देतो. तरीही डोळे दाखवत असाल तर डोळे काढण्याची ताकद हिदुस्तानात आहे. तुमच्याकडे बॉम्ब असल्याची धमकी देऊ नका. तुमच्याकडे फुसके बॉम्ब आहेत. आमचे पंतप्रधान शांत आहेत. पण शांततेनंतर क्रांती होत असते. आमच्याकडे असलेल्या बॉम्बचा प्रयोग करु. तुम्हाला त्याची ताकद दाखवून देऊ. आणि जे दिवसा स्वप्न बघत आहात, की पाकिस्तानची वीट बाबरीत ठेवाल आणि अझान करणारा पाकिस्तानी मौला असेल तर तुम्हाला सांगून ठेवते, की दिवसाचे स्वप्न कधी खरे नसतात.

तुम्हाला एवढंच सांगते, की कारण तुमचा बार हिदुस्तानात बसलाय. बाबरीच्या विटेवर डोळा ठेवला तर तुझे डोळे काढायला आम्ही मागे पुढे बघणार नाही. आधी आम्ही जातींमध्ये विभागलो होतो. परंतु, आता हिंदूस्तान एक आहे. आम्ही जय श्रीराम आणि जय भीमचे नारे देत मैदानात उतरु. तेव्हा तुम्हाला तुमची लायकी कळेल.

पाकिस्तानी सिनेटर पलवाशा महंमद झई खान यांनी पाकिस्तानी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हटले होते, की बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तानी जवान अयोध्येत ठेवेल. आणि आमचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर पहिली अझान ठेवतील. आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत.

तसेच त्यांनी सांगितले, की भारताचे शीख सैनिक पाकिस्तानवर हल्ला करणार नाहीत. पाकिस्तान ही शीखांचे गुरु गुरु नानक यांची भूमी आहे. त्यामुळे ते कधीही पाकिस्तानवर हल्ला करणार नाहीत.

----------------

PREV

Recommended Stories

मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील कोंडीला ब्रेक, मीरा-भाईंदरमध्ये नवे वाहतूक नियोजन; 15 डिसेंबरपासून अंमलबजावणी
महाराष्ट्राला गतिमानता! पुणे-मुंबई दीड तासात, संभाजीनगरसाठी नवा एक्स्प्रेसवे; नितीन गडकरींची मोठी घोषणा