पुणे: नगर जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या संयमी आणि कणखर नेतृत्वासाठी ओळखले जाणारे माजी आमदार अरुणकाका जगताप यांनी आज पहाटे २ वाजता पुण्यातील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे अहमदनगरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. सध्या आमदार असलेल्या संग्राम जगताप यांना पितृशोकाचा मोठा आघात बसला आहे.
५ एप्रिल रोजी अचानक तब्येत खालावल्याने अरुणकाकांना नगरहून पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी तब्बल एक महिना मृत्यूशी झुंज दिली. मात्र, आज पहाटे त्यांनी आपल्या आयुष्याचा शेवटचा श्वास घेतला.
अरुण जगताप हे नगरच्या राजकारणातील एक भरीव व्यक्तिमत्त्व होते. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर नगरपालिकेचे नगरसेवक आणि अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली, परंतु अपयश मिळाल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. पुढे ते दोन वेळा विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले आणि राज्याच्या राजकारणात आपली खास ओळख निर्माण केली.
राजकारणासोबतच अरुणकाकांचा खेळ आणि शिक्षण क्षेत्रातही प्रभावी सहभाग होता. ते अहमदनगर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे कार्यकारी सदस्य होते. गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले.
मूळचे काँग्रेस विचारसरणीचे अरुण जगताप यांनी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, शिवसेनेत फार काळ रमू शकले नाहीत. अवघ्या सहा महिन्यांतच त्यांनी काँग्रेसमध्ये पुनरागमन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे ते अतिशय जवळचे आणि विश्वासू समजले जात.
अरुणकाका हे आमदार शिवाजीराव कर्डिले आणि भानुदास कोतकर यांचे व्याही होते. त्यांचे कुटुंब राजकारणात सक्रीय असून पुत्र संग्राम जगताप हे सध्या आमदार आहेत. अरुणकाकांचे कार्यकर्त्यांशी घट्ट नातं होते. त्यामुळे त्यांना ‘नगरचे काका’ म्हणून लोक ओळखत.
त्यांचे पार्थिव आज दुपारी २ वाजल्यापासून भवानीनगर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर, आजच सायंकाळी ४ वाजता अहिल्यानगर येथील अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
अरुण जगताप यांच्या निधनाने केवळ राजकारणच नव्हे, तर सामाजिक व क्रीडा क्षेत्रानेही एक उमदा नेता गमावला आहे. संयम, शिस्त आणि जनतेशी जोडलेली नाळ या गुणांमुळे त्यांनी ‘काका’ हे नाव फक्त नात्यापुरतं नाही, तर नगरच्या जनतेच्या काळजावर कोरलं होतं. नगर जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या संयमी आणि कणखर नेतृत्वासाठी ओळखले जाणारे माजी आमदार अरुणकाका जगताप यांनी आज पहाटे २ वाजता पुण्यातील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे अहमदनगरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. सध्या आमदार असलेल्या संग्राम जगताप यांना पितृशोकाचा मोठा आघात बसला आहे.
५ एप्रिल रोजी अचानक तब्येत खालावल्याने अरुणकाकांना नगरहून पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी तब्बल एक महिना मृत्यूशी झुंज दिली. मात्र, आज पहाटे त्यांनी आपल्या आयुष्याचा शेवटचा श्वास घेतला.
अरुण जगताप हे नगरच्या राजकारणातील एक भरीव व्यक्तिमत्त्व होते. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर नगरपालिकेचे नगरसेवक आणि अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली, परंतु अपयश मिळाल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. पुढे ते दोन वेळा विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले आणि राज्याच्या राजकारणात आपली खास ओळख निर्माण केली.
राजकारणासोबतच अरुणकाकांचा खेळ आणि शिक्षण क्षेत्रातही प्रभावी सहभाग होता. ते अहमदनगर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे कार्यकारी सदस्य होते. गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले.
मूळचे काँग्रेस विचारसरणीचे अरुण जगताप यांनी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, शिवसेनेत फार काळ रमू शकले नाहीत. अवघ्या सहा महिन्यांतच त्यांनी काँग्रेसमध्ये पुनरागमन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे ते अतिशय जवळचे आणि विश्वासू समजले जात.
अरुणकाका हे आमदार शिवाजीराव कर्डिले आणि भानुदास कोतकर यांचे व्याही होते. त्यांचे कुटुंब राजकारणात सक्रीय असून पुत्र संग्राम जगताप हे सध्या आमदार आहेत. अरुणकाकांचे कार्यकर्त्यांशी घट्ट नातं होते. त्यामुळे त्यांना ‘नगरचे काका’ म्हणून लोक ओळखत.
त्यांचे पार्थिव आज दुपारी २ वाजल्यापासून भवानीनगर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर, आजच सायंकाळी ४ वाजता अहिल्यानगर येथील अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
अरुण जगताप यांच्या निधनाने केवळ राजकारणच नव्हे, तर सामाजिक व क्रीडा क्षेत्रानेही एक उमदा नेता गमावला आहे. संयम, शिस्त आणि जनतेशी जोडलेली नाळ या गुणांमुळे त्यांनी ‘काका’ हे नाव फक्त नात्यापुरतं नाही, तर नगरच्या जनतेच्या काळजावर कोरलं होतं.