कांद्यानं महायुतीच्या 7 उमेदवारांचा केला करेक्ट कार्यक्रम!, निर्यातबंदीचा महायुतीला फटका

Published : Jun 05, 2024, 06:01 PM IST
Onion Price Today

सार

Loksabha Election Result 2024 : कांदा उत्पादक पट्ट्यात महायुतीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी महायुतीच्या विरोधात मतदान केल्याचं चित्र पाहायला मिळालं. 

महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांचे सर्व निकाल (Loksabha Election Result) हाती आले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीनं बाजी मारलीय. त्यांना 30 जागांवर यश मिळालं आहे. अनेक ठिकाणी दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. दरम्यान, या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या (Farmers) आक्रोशाचा मोठा फटका भाजपला बसला आहे. विशेषत: कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी (Onion Farmers) भाजपच्या विरोधात मतदान केल्यानं अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. मात्र, शेतकऱ्यांचा कांदा बाजारात आला की सरकारच्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसतो. वाढलेले दर कमी होतात. यावर्षी देखील तसच झालं. कांद्याचे दर वाढले की सरकारनं कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळं कांद्याचे दर खूप कमी झाले, याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यामुळं शेतकरी आक्रमक झाले होते. सरकारच्या या धोरणाचा शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन निषेध केला होता. शेतकऱ्यांचा हाच रोष लोकसभा निवडणुकीत कांदा पट्ट्यात पाहायला मिळाला. कांदा पट्ट्यातील खासदारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. जाणून घेऊयात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कोण कोणत्या उमेदवारांना पराभवाचा धक्का दिला आहे.

'या' 7 उमेदवारांचा कांद्यानं केला करेक्ट कार्यक्रम

1) भारती पवार (दिंडोरी) - पराभूत

2) हेमंत गोडसे (नाशिक) - पराभूत

3) हिना गावित (नंदुरबार) - पराभूत

4) सुजय विखे पाटील (अहमदनगर दक्षिण)- पराभूत

5) सुभाष भामरे (धुळे) - पराभूत

6) शिवाजीराव अढळराव पाटील (शिरुर) - पराभुत

7) सदाशिव लोखंडे (शिर्डी) - पराभुत

आणखी वाचा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा, राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींची घेतली भेट

 

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

नववर्षात कोकण-गोवा ट्रिप प्लॅन केलीय? रेल्वेची मोठी घोषणा, या मार्गांवर धावणार खास गाड्या वेळापत्रक जाणून घ्या
तिकीट बुक करा! मराठवाड्यासाठी रेल्वेच्या ३ स्पेशल गाड्या सुरू; कुठून-कधी सुटणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर!